Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजStock Market Update: सेंसेक्समध्ये १६०० अंकाची उसळी, निफ्टी २३५०० वर; गुंतवणूकदार एकाच...

Stock Market Update: सेंसेक्समध्ये १६०० अंकाची उसळी, निफ्टी २३५०० वर; गुंतवणूकदार एकाच दिवसांत मालामाल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मागील अनेक दिवसांच्या सत्रातील घसरणीनंतर शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. अमेरिका आणि इराने दरम्यानच्या संभाव्य शांतता करारामुळे जागतिक पातळीवर सकारात्मक संकेत मिळाले आणि गुंतवणूकदारांनी बाजारात चौफेर खरेदी केल्याचे पहायला मिळाले.

अमेरिका इराण शांतता कराराचा भारतीय शेअर बाजारावर साकरात्मक परिणाम
इराणशी संबंधित वृत्तसंस्था मेहरने दिलेल्या अहवालानुसार तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यात प्रस्तावित सामंजस्य करारात इराणवरील निर्बंध हटवणे, हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील अमेरिकेची नौदल नाकेबंदी संपवणे आणि इराणच्या आसपास तैनात अमेरिकन सैन्य माघारी घेणे यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली. या वृत्तामुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

- Advertisement -

शुक्रवार, व्यापारी सत्राच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1695.40 अंकांच्या म्हणजे 2.30 टक्क्यांच्या ऐतिहासिक उसळीसह 75,527.95 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 50′ हा 461 अंकांच्या (1.99%) वाढीसह 23,622.90 वर स्थिरावला. एकाच दिवसात गुंतवणूकदारांची संपत्ती तब्बल 10 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढल्याचं दिसून आलं.

Nashik Crime News: “धक्कादायक! १६ वर्षीय अनाथ मुलीची मानवी तस्करी; २ लाखांचा UPI व्यवहार, ऑपरेशन शोध ठरलं यशस्वी”

यावेळी, तेल कंपन्यांमध्ये जोरदार खरेदी झाल्याचे बघायला मिळाले. बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइलच्या शेअर्समध्ये 2.4 टक्क्यांपासून 3.8 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याचा फायदा विमान वाहतूक क्षेत्रालाही झाला आणि इंडिगोच्या शेअरमध्ये 3.5 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. रंग, टायर आणि सिमेंट क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्सही वाढले. या उद्योगांनाही कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतींचा थेट फायदा होतो. लार्सन अँड टुब्रो (L&T) च्या शेअरमध्ये 2.8 टक्क्यांची वाढ झाल्याचे पहायला मिळाले.

पीएसयू बँक आणि प्रायव्हेट बँकेच्या निर्देशांकात प्रत्येकी अडीच टक्क्यांहून अधिक तेजी होती. निफ्टी रियल्टी निर्देशांक सर्वाधिक 3.53 टक्क्यांनी वधारला, तर निफ्टी ऑटोमध्येही जवळपास 2 टक्क्यांची मजबूत वाढ झाली.

बाजारातील तेजीचे कारण
अमेरिका-इराण शांतता कराराच्या आशा- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील प्रस्तावित हल्ला स्थगित केल्यानंतर भू-राजकीय तणाव कमी झाल्याचे चित्र दिसून आले. ट्रम्प यांनी आठवड्याच्या अखेरीस अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार होण्याची शक्यता व्यक्त केली. यामुळे जागतिक गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.

कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण- अमेरिका-इराण तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ८८.५५ डॉलरवर पोहोचले, तर WTI क्रूड प्रति बॅरल ८६.११ डॉलरवर आले. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल आयातदार देश असल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक मानली जाते. यामुळे महागाईवरील दबाव कमी होण्यास, आयात खर्च घटण्यास आणि कंपन्यांच्या नफ्यात वाढ होण्यास मदत होऊ शकते.

(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...