Thursday, March 13, 2025
Homeदेश विदेशबागपतमध्ये निर्वाण महोत्सवात भीषण दुर्घटना; स्टेज कोसळून ७ भाविकांचा मृत्यू, ८० जखमी

बागपतमध्ये निर्वाण महोत्सवात भीषण दुर्घटना; स्टेज कोसळून ७ भाविकांचा मृत्यू, ८० जखमी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बागपतमध्ये (Baghpat) आज (मंगळवारी)जैन समुदायाच्या निर्वाण महोत्सवादरम्यान लाडू उत्सवाच्या कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेला लाकडी स्टेज कोसळल्याने (Stage Collapsed) मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये ७ भाविकांचा (Devotees) मृत्यू (Death) झाला असून ८० जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये कोसळलेल्या लाकडी स्टेजखाली ५० पेक्षा अधिक जण दबल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

बागपत शहरापासून २० किमी अंतरावर असलेल्या बरौत तहसीलमध्ये सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान ही दुर्घटना घडली . या उत्सवात भगवान आदिनाथांना (Lord Adinath) प्रसाद अर्पण करण्याचा कार्यक्रम सुरू होता. ६५ फूट उंच लाकडी स्टेज बांधण्यात आला होता.त्यावर परमेश्वराची ४-५ फूट उंच मूर्ती ठेवण्यात आली होती. भक्त भगवानांपर्यंत पोहोचण्यासाठी मचाणासारख्या पायऱ्या चढत होते. मात्र, यावेळी वाढत्या वजनामुळे संपूर्ण मचाण खाली कोसळला. त्यामुळे या दुर्घटनेच ७ जणांचा जागीच मृत्यू झाला.

तसेच या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी पोलिसांनी (Police) आणि रुग्णवाहिकांनी धाव घेतली. यावेळी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तर या घटनेनंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता. तसेच सदर दुर्घटनेमध्ये १५ पोलिस देखील जखमी झाल्याचे बोलले जात असून जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

तर बागपतचे डीएम अस्मिता लाल (Asmita Lal) यांनी म्हटले की, “बरौत येथे जैन समाजाचा एक कार्यक्रम होता. येथे एक लाकडी स्टेज बांधण्यात आला होता. ही घटना घडली त्यावेळी स्टेजवर आणि जवळ अनेक जण उपस्थित होते. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत जखमींपैकी २० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तसेच इतर जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत”, असे त्या म्हणाल्या.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

योगी आदित्यनाथ यांनी बागपत जिल्ह्यातील घटनेची दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासोबतच त्यांनी जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थनाही केली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, आयोजकांनी यासाठी ६५ फूट उंच लाकडी स्टेज बांधला होता. वर भगवानांची ४-५ फूट उंच मूर्ती ठेवण्यात आली होती. भक्त भगवानांपर्यंत पोहोचण्यासाठी मचानासारख्या पायऱ्या चढत होते. दरम्यान, वाढत्या वजनामुळे संपूर्ण मचान कोसळला. घटनास्थळी आरडाओरडा आणि आरडाओरडा सुरू होता. मचानाखाली गाडलेले लोक मदतीसाठी ओरडू लागले. बाकीचे लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. हे दृश्य खूप वेदनादायक होते, असे त्यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...