Monday, June 15, 2026
HomeनगरShani Shingnapur : कुणाचा आदेश पाळावा? शनैश्वर देवस्थानचे कर्मचारी तणावात

Shani Shingnapur : कुणाचा आदेश पाळावा? शनैश्वर देवस्थानचे कर्मचारी तणावात

दोन्ही बाजूच्या अधिकार्‍यांकडून दडपण

सोनई |वार्ताहर| Sonai

शिंगणापूर देवस्थान बाबत खंडपीठाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने दोन्ही बाजूच्या लोकांनी आपआपल्या परीने त्याचा अर्थ घेत आम्हीच कारभार पाहणार या भूमिकेतून काम चालू केले आहे. परंतु अधिकार्‍यांकडून कर्मचार्‍यांना दडपण आणले जात असल्याने कर्मचारी मोठ्या मानसिक दडपणात असल्याची चर्चा मंदिर परिसरात होत आहे.

- Advertisement -

राज्य शासनाच्या विरोधात माजी विश्वस्तांनी खंडपीठात अपील दाखल केले. दोघांनी आपआपली बाजू मांडली. त्यावर सध्या ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश खंडपीठाने दिले. याबाबत पुढील सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आता नूतन कार्यकारी समिती तसेच जुने विश्वस्त सांगत आहे की आम्हीच काम पाहणार. देवस्थानच्या विभाग प्रमुखांना माहिती मागवली जात आहे. विभाग प्रमुख कार्यकारी अधिकारी गोरखनाथ दरंदले व नूतन सचिव राजेंद्र वाकचौरे दोघांना माहिती देत आहे.

नूतन सचिव यांनी आपल्या सहिनीशी कर्मचार्‍यांना व प्रमुखांना पत्र काढले आहे की कामकाजात व्यत्यय निर्माण झाल्यास त्यांच्या कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल. अशी सर्व परिस्थिती असल्याने कर्मचारी मोठ्या तणावात आहे. कुणाचा आदेश पाळवा या विवंचनेत आहे. देवस्थान कुणीही चालवावे त्याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करणार आहोत परंतु ह्या वादाचा आम्हाला त्रास नको अशी भावना कर्मचार्‍यांत झाली आहे.

न्यायालयाचा अवमान टाळण्यासाठी विश्वस्तांचा निर्णय –
विश्वस्त मंडळाची सोमवारी सकाळी तातडीची बैठक झाली. यात असा निर्णय झाला की न्यायालयाचा अवमान होऊ नये व कायदा सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी सोमवारी दानपात्र न उघडण्याचा निर्णय घेण्यात आला व याबाबत जिल्हाधिकार्‍यांना पत्र देऊन विनंती केली की आपल्या अधिकार्‍यांना याबाबत कळवावे.

अध्यक्षाचे बँकांना पत्र
विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे अध्यक्ष यांनी देवस्थानचे ज्या ज्या बँकेत खाते आहे तेथे पत्र दिले की खंडपीठाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवली आहे व न्यायालायचा निर्णय झाला त्या वेळेस बँकेत आमच्याच सह्यांचे अधिकार असल्याने दुसरे खाते उघडू देऊ नये. त्यामुळे बँका सुद्धा कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहेत.

ताज्या बातम्या

घारगावमध्ये पोलिसांचा छापा; ७० लिटर ताडी दारूसह महिला जेरबंद

0
घारगाव । प्रतिनिधी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एका 'फिटनेस जिम'च्या पाठीमागे बेकायदेशीररित्या ताडी दारू विकणाऱ्या एका महिलेवर घारगाव पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी...