Sunday, July 26, 2026
HomeनगरNewasa : 19 मे पर्यंत शनीदर्शन राहणार 24 तास सुरु

Newasa : 19 मे पर्यंत शनीदर्शन राहणार 24 तास सुरु

सोनई |वार्ताहर| Sonai

श्री शनैश्वर जयंती व शनी अमावस्या यात्रेनिमित्त 13 ते 19 मे या कालावधीत शनि मंदिर 24 तास सुरू ठेवण्यात येणार असून देवस्थानच्या विभाग प्रमुखांना त्याची तयारी करण्याचे लेखी आदेश शनैश्वर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिले आहेत.

- Advertisement -

या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत मंदिर दर्शन व्यवस्था 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. विविध माध्यमातून मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले ठेवणे बाबत मागणी होत असते. याबाबत या कालावधीत प्रायोगिक तत्वावर प्रशासकीय नियोजन व माहिती संकलित करता येईल व भविष्य काळात मंदिर दर्शनासाठी 24 तास सुरू ठेवणेबाबत निर्णय घेण्यास मदत होईल.

भाविकांना सुविधा व सुरक्षा मिळावी यासाठी प्रशासक डॉ. प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, वाहनतळ, पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था व अन्य सर्व गोष्टींसाठी देवस्थानच्या कर्मचार्‍यांना सूचना दिल्या असून पोलिसांसह शासनाचे विविध विभागाचे प्रमुख यांनाही सूचना दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “सेलिब्रेशनसाठी त्यांना कारण मिळाल्याचा मला आनंद”; CM फडणवीसांचा...

0
मुंबई | Mumbai नीट पेपरफुटी प्रकरणात (Neet Paper Leak) विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी...