Wednesday, July 29, 2026
HomeनगरAhilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान अ‍ॅप घोटाळा तपास ठप्प

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान अ‍ॅप घोटाळा तपास ठप्प

दोन महिने निष्क्रीय चौकशी ? || पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यभर चर्चेत असलेला आणि विधिमंडळाच्या मागील अधिवेशनातही गाजलेला शनिशिंगणापूर देवस्थानच्या बनावट अ‍ॅप घोटाळ्याचा तपास दोन महिन्यांपासून ठप्प पडला आहे. तब्बल कोट्यवधी रूपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतरही आजवर एकाही आरोपीला अटक झालेली नाही. तपास केवळ सुरू आहे एवढ्यापुरतीच अधिकृत माहिती पोलीस विभाग देत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisement -

या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. देवस्थानच्या अधिकृत परवानगीतील तीन अ‍ॅप व्यतिरिक्त आणखी चार बेकायदेशीर अ‍ॅप आढळून आले. या माध्यमातून जमा झालेल्या देणग्यांपैकी काही निधी थेट देवस्थानच्या दोन कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक खात्यात वळवला गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले. रकमेचा आकडा तब्बल एक कोटी रूपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते.

तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी सांगितले की, आतापर्यंत देवस्थान विश्वस्त, कर्मचारी व पुजार्‍यांसह 38 जणांची चौकशी करण्यात आली आहे. तब्बल 20 बँक खाती तपासली असून अ‍ॅपच्या माध्यमातून पैशांची आवक-जावक कशी झाली, कोणाकडे निधी पोहोचला याची माहिती घेतली जात आहे. तरीसुध्दा आरोपींवर कारवाईची प्रक्रिया झालेली नाही. या प्रकरणी पुढील कायदेशीर पावले उचलण्यासाठी सरकारी वकिलांचा सल्ला मागवण्यात आल्याचेही पेंदाम यांनी स्पष्ट केले. तपासात कोणताही दबाव नाही, असा दावा त्यांनी केला.

जनतेत संशयाचे वातावरण
घोटाळ्याबाबत तक्रारी झाल्या, अधिवेशनातही प्रश्न उपस्थित झाला. याबाबत जनतेत प्रचंड असंतोष आहे. मात्र, दोन महिन्यांनंतरही ठोस निष्कर्ष न लागल्याने तपास थंडावल्याची चर्चा सुरू आहे. देवस्थानसारख्या राष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द असलेल्या धार्मिक स्थळाशी निगडीत हा भ्रष्टाचार प्रकरण अद्यापही चौकशीपुरताच मर्यादित राहिल्याने प्रश्नचिन्ह कायम आहे.

ताज्या बातम्या

Rahata : नगर-नाशिकवरील समन्यायीचे संकट टळले

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata यावर्षी विक्रमी वेळेत म्हणजे 28 जुलै 2026 रोजी रात्री उशिरा जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 65 टक्के म्हणजे 50 टीएमसी झाला आहे.काल...