Thursday, May 2, 2024
Homeनगरशरद निमसेच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ

शरद निमसेच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरीतील राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेमध्ये झालेल्या 7 कोटी 37 लक्ष 62 हजार रुपयांच्या अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेला पतसंस्थेचा व्हा. चेअरमन शरद निमसे याच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

राहुरी येथील राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेमध्ये मोठा अपहार झाला असून अनेक तक्रारींनंतर जिल्हा निबंधकांच्या आदेशानुसार शासकीय लेखा परीक्षकांनी राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या कामकाजाचे लेखापरीक्षण केल्याने 1 एप्रिल 2016 ते सन 31 मार्च 2021 या कालावधीमध्ये झालेल्या सर्व व्यवहारांच्या चौकशीमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार करण्यात आल्याचे उघडकीस आले.

राजमाता पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब येवले, उपाध्यक्ष शरदराव निमसे, मॅनेजर कारभारी फाटक, सुनील भोंगळ, उत्तम तारडे, सुरेखा सांगळे, सुरेश पवार, दत्तात्रय बोंबले, दीपक बंगाळ या 9 जणांनी पतसंस्थेमध्ये 7 कोटी 37 लक्ष 62 हजार रुपयांचा अपहार केल्याचा लेखा परीक्षणात ठपका ठेवण्यात आला आहे.

राहुरी पोलिसांत लेखापरीक्षक संजय धनवडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे सर्व आरोपी पसार झाले आहेत. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी शरद निमसे याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांंची पोलीस कोठडी सुनावली होती. काल पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. 19 डिसेंबरपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या