Tuesday, July 23, 2024
Homeराजकीय“लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या, पण आता…”; पवारांचं सूचक विधान

“लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या, पण आता…”; पवारांचं सूचक विधान

पुणे । प्रतिनिधि

- Advertisement -

आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात जास्त जागा मिळायला हव्या होत्या. परंतु, महाविकास आघाडीची एकी कायम राहावी, यासाठी मी दोन पावलं मागे आलो. आपण एकत्रित राहिलो म्हणून लोकसभा निवडणुकीत यश मिळाले.

उद्यापासून विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा. आपल्याला राज्य हातात घ्यायचे आहे, त्याची तयारी ठेवा. त्यासाठी लोकांची जास्तीत जास्तं काम करा. राज्यातील लोकांचा दिल्लीशी फारसा संबंध येत नाही. राज्यात जास्त प्रश्न असतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असा आदेश जेष्ठ नेते शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

दरम्यान, पवार यांच्या, “आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात जास्त जागा मिळायला हव्या होत्या” या वक्तव्यावरून विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त जागांवर दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची पुण्यात आज बैठक झाली. या बैठकीत शरद पवार बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार, बाळासाहेब पाटील, यांच्यासह पक्षाचे आठ खासदार बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी शरद पवार यांनी हे वक्तव्य करुन एकच खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार यांचे हे वक्तव्य पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत मविआच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेईल, असे संकेत मिळत आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. या यशात सर्वाधिक वाटा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे. शरद पवार यांचा स्ट्राईक रेट महाविकास आघाडीत सर्वाधिक आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने अवघ्या १० जागा लढवल्या होत्या. तर ठाकरे गटाने २१ आणि काँग्रेस पक्षाने १७ जागा लढवल्या होत्या. मात्र, लोकसभेचा निकाल लागला तेव्हा शरद पवार गटाने १० पैकी ८, काँग्रेसने १७ पैकी १३ आणि ठाकरे गटाने २१ पैकी अवघ्या ९ जागांवर विजय मिळवला होता. शरद पवार गटाचा लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट ८० टक्के इतका होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट जास्त जागांची मागणी करणार, याचा अंदाज वर्तविला जात होता. शरद पवार यांच्या ताज्या वक्तव्याने या अंदाजाला आणखीनच बळकटी मिळाली आहे.

पवारांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश

इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत कुठलीही गडबड होऊ नये यासाठी शरद पवारांनी लोकसभेला कमी
जागांवर समाधान मानले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी २३ पेक्षा अधिक जागा लढवल्या
होत्या. आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगल्या जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. पश्चिम महाराष्ट्रात
राष्ट्रवादी शरद पवार गटाची मोठी ताकद आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक
जोश निर्माण झाला आहे, असे शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी सांगितले.

विजयामुळे कोणीही हवेत राहू नका- सुप्रिया सुळे

विजयामुळे कोणीही हवेत राहू नका. आपण आता संघर्ष केला आहे. मात्र लढाई मोठी आहे. आपल्याला अजून ती लढायची आहे. ऑक्टोबरमध्ये सगळ्यांना काम करायच आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभा निवडणुकीच रणशिंग फुंकले. मला आता कुठे निवडून आल्यासारखे वाटत आहे. भोरमध्ये माझी विजयाची मिरवणूक ५ तास चालली. त्यामुळे मला बारामतीचा दौरा रद्द करावा लागला होता.

माढा लोकसभा मतदार संघातून विजयी झालेले शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटले
की, पवारसाहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. माझ्या विजयातकरमाळा तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. तुमच्या अपेक्षा आहेत त्यापेक्षा
अनेक पटीत माझ्याकडून काम झाले पाहिजे.

- Advertisment -

ताज्या बातम्या