मुंबई | Mumbai
“मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो मग तुम्हाला काय अडचण आहे?” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता. मांसाहारावरून सध्या राज्याच्या राजकारणात गदारोळ पाहायला मिळत आहे. मांसाहारावरून वेगवेगळी वक्तव्ये करणाऱ्या महायुतीतील नेत्यांवर खासदार सुळे यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर आता वारकरी संप्रदायातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
मी रामकृष्ण हरी वाली आहे. फक्त माळ घालत नाही, कधी कधी खाते, खरं बोलते, मी त्यांच्यासारखे खोटं बोलत नाही आणि खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांच्या या विधानाने गोंधळ उडाला आहे. पांडुरंगाला मांसाहार करणे चालते असे म्हणणे मूर्खपणा असल्याचे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले म्हणाले. तर तुम्ही काय खाताय ते सार्वजनिक सांगण्याची गरज नसल्याचे भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले होते की ‘वारकरीच सुप्रिया सुळे यांना उत्तर देतील’. अशातच. ह. भ. प. बाळासाहेब महाराज खरात यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
बापानी कधी पांडुरंगाच्या चंरणी डोक टेकले नाही
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. पांडुरंगाला मांसाहार चालतो असे कुठलाही शहाणा माणूस कधीच म्हणणार नाही. हा पांडुरंगाचा अपमान आहे. हा माळकऱ्यांचा अपमान आहे. बापानी कधी पांडुरंगाच्या चंरणी डोक टेकलं नाही तर मुली कडून काय आपेक्षा करणार त्यामुळे सुप्रिया सुळे यांना काय बोलावे यासाठी मला शब्दच सुचत नाहीयेत. त्यांना शृपनखा म्हणावे का? परंतु, असा कुठलाही शब्द वापरला तर त्या शब्दाचाच अपमान होईल.”
सुप्रिया सुळेंनी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावे यामध्ये कुठेही वारकरी संप्रदायाचा अपमान करू नये. बापानी कधी पांडुरंगाच्या चंरणी डोक टेकल नाही तर मुली कडून काय आपेक्षा करणार असे हभप खरात महाराज म्हणाले.
बाळासाहेब खरात म्हणाले, “सत्तेसाठी ही मंडळी कुठल्याही थराला जातील, वाचाळवीरांसारखं काय बोलतील हे आपण सांगू शकत नाही. आम्ही पांडुरंगाचा अपमान सहन करू शकत नाही. त्यामुळे मी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांनी यापुढे असं वक्तव्य केलं तर सगळे वारकरी त्यांना धडा शिकवतील. मी स्वतः देखील काहीही करू शकतो. मी माझ्या पांडुरंगाचा, माझ्या संप्रदायाचा अपमान सहन करणार नाही. कारण मी ज्याचं खातो त्याचाच गातो, मी पुढाऱ्यांचं गाणं गाणार नाही.”
वारकरी सांप्रदायाने लोकांना मद्य आणि मांस यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. याचा कुठेतरी सुप्रिया सुळे यांच्याकडून हरताळ फासण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महाराजांनी केला. भगवान विठ्ठल हा सर्वांचाच माता-पिता आहे. भगवान विठ्ठलाने सर्व जीव जंतू तयार केले आहेत. त्यांची हत्या करून भक्षण करणे हे त्या मात्यापित्याला म्हणजेच विठ्ठलाला नक्कीच आवडणार नाही. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य निषेधार्हय आहे.
वारकऱ्यांच्या पांडुरंगाला बळी दिलेला चालत नाही त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा पांडुरंग कोणता दोन पांडुरंग आहेत का असा प्रश्न कबीर महाराजांनी उपस्थित करत या वक्तव्याचा निषेध केला. मौस खाता हौस करी जोडूनी वैरी ठेवीला या संत वचनानुसार वारकरी संप्रदाय चालतो या वक्तव्याचा विपर्यास करून सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान निषेधार्य आहे, असे खरात महाराज म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




