Monday, June 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar: हिंदी भाषा सक्तीवरुन शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ही गोष्ट...

Sharad Pawar: हिंदी भाषा सक्तीवरुन शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ही गोष्ट दुर्लक्षित करुन चालणार नाही, ‘हिंदीची सक्ती असू…

पुणे | Pune
राज्यात हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा स्वीकार करत मराठी, इंग्रजीसोबत हिंदी भाषादेखील पहिलीपासून सक्तीची करण्यात येईल, असे सांगितले होते. या टीकेनंतर सरकारने एक पाऊल मागे घेत हिंदी भाषा ही बंधनकारक नसेल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर राज्य सरकारने नवीन जीआर काढत केवळ ‘अनिवार्य’ शब्द वगळत असून, २० पटसंख्या असल्यास इतर भाषा शिकता येणार, असे नमूद केले आहे. त्यावरुन महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षांनी हिंदी सक्तीला विरोध केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंदी भाषा सक्तीवर पहिली प्रतिक्रिया दिली असून हिंदी भाषा सक्तीला शरद पवारांनी विरोध केला आहे.

शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यासोबत राज्यातील वेगवेगळ्या विषयांवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी हिंदी भाषा सक्तीबाबत त्यांनी आपले मत मांडताना थेट फडणवीस सरकारवर टीका केली. त्यांनी सांगितले की, ‘हिंदीची सक्ती असू नये. पण हिंदी भाषेचा द्वेष करणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. फक्त सक्ती असू नये. शेवटी त्या विद्यार्थ्याला जे हवेय ते त्याने करावे. त्याच्या पालकांनी त्याला जे मार्गदर्शन केले त्यानुसार निर्णय घ्यावा. हिंदीची सक्ती नको. एखाद्याला येत असेल किंवा तो शिकत असेल तर नाही बोलण्याचे कारण नाही, असे शरद पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले की, ही गोष्ट दुर्लक्षित करुन चालणार नाही. संपूर्ण हिंदुस्थानातील जी लोकसंख्या आहे, 55 ते 60 टक्के लोक हिंदी बोलतात. त्यामुळे संवाद करण्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग होतो, असे स्पष्ट मत शरद पवारांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

एकत्रित निर्णय घेणार
शरद पवारांनी स्थानिक संस्था, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात बोलताना सांगितले की, “सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार, आता तीन महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया सुरु होईल. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष आम्ही एकत्र बसू. निवडणुकीला एकत्र सामोरे जाता येईल का यावर चर्चा आणि विचार करु. त्यानंतर एकत्रित निर्णय घेऊ. मुंबईत आम्हा सगळ्यात उद्धव ठाकरेंची ताकद जास्त आहे. तिथे त्यांना विचारात घ्यावे लागेल”. त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीकडून काय निर्णय घेण्यात येणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Jalgaon MLC Election : जळगाव विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे महाजन विजयी; मविआच्या...

0
जळगाव | प्रतिनिधी | Jalgaon विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे महायुतीचे (Mahayuti) नंदकिशोर महाजन (Nandkishor Mahajan) मोठया मतधिक्याने विजयी झाले आहे. महाजन...