Thursday, March 13, 2025
Homeक्राईमशेअर मार्केटच्या पैशांवरून पाथर्डीत चाकूने वार; दोघे जखमी

शेअर मार्केटच्या पैशांवरून पाथर्डीत चाकूने वार; दोघे जखमी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शेअर मार्केट मध्ये गुंतलेल्या पैशाच्या मुद्यावरून दोन तरुणांना एकाजणाने धारदार शस्राने वार करत जखमी केल्याची घटना रविवारी (दि. 23) रात्री पाथर्डी शहरातील शेवगाव रोड लगत असलेल्या एका हॉटेलजवळ घडली. यासंदर्भात दाखल झालेल्या फिर्यादीत मात्र केवळ पैशाच्या मुद्यावरून वाद झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले असले तरीही हा प्रकार शेअर मार्केटमध्ये गुंतलेल्या पैशावरूनच झाला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. यासंदर्भात माहिती अशी, या घटनेत जखमी झालेले आशिष रमेश खंबाट व अमोल पांडुरंग रेवाडकर (रा. वरुर, ता. शेवगाव) हे दोघेही पाथर्डी शहरातील शेवगाव रोड लगत असलेल्या हॉटेल राजयोगमध्ये जेवणासाठी आले होते.

- Advertisement -

थोड्यावेळाने या घटनेतील आरोपी महेश बाळासाहेब काटे (रा. आखेगाव, ता. शेवगाव) हा त्याठिकाणी आला. यानंतर तिघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपी काटे याने खंबाट व रेवाडकर यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या मारहाणीत खंबाट याच्या डाव्या हाताला तर रेवाडकर याच्या मानेला जबर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काटे याला ताब्यात घेतले. जखमी झालेल्या खंबाट व रेवाडकर यांच्यावर शहरातील उपजिल्हा रुग्नालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

संशयित आरोपी काटे याच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता येत्या 27 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान समजलेल्या माहितीनुसार शेअर मार्केटमध्ये गुंतलेल्या पैशावरूनच या तिघांमध्ये वाद झाला असून त्याचे पर्यावसान मारामारीमध्ये झाले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : शिक्षणाधिकारी पाटील यांची आजपासून चौकशी

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक मनपा (Nashik NMC) शिक्षणाधिकारी बापूसाहेब पाटील (Bapusaheb Patil) यांनी शिक्षक समायोजन बदल्या व मुख्यध्यापक नेमणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार...