Monday, May 4, 2026
HomeनगरShani Shingnapur : शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांनी घेतले शनीदर्शन

Shani Shingnapur : शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांनी घेतले शनीदर्शन

शनिशिंगणापूर |वार्ताहर| Shani Shingnapur

सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी (Actress Shilpa Shetty) हिने शुक्रवारी पती राज कुंद्रा (Raj Kundra) व परिवारासह शनिशिंगणापूरला येवून दर्शन घेतले. उदासी महाराज मठात अभिषेक केला.

- Advertisement -

उदासी महाराज मठात शिल्पा व राज यांनी संकल्प सोडून नंतर अभिषेक केला. चौथर्‍यावर जाऊन दोघांनी मूर्तीवर तेल अर्पण केले. विशाल कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. जनसंपर्क कार्यालयात देवस्थानचे विश्वस्त दीपक दरंदले व माजी विश्वस्त सयाराम बानकर यांनी शिल्पा शेट्टी (Actress Shilpa Shetty) व राज कुंद्रा (Raj Kundra) यांचा सत्कार केला. यावेळी शिल्पाची आई सुनंदा शेट्टी व राज कुंद्राची बहीण रिना कुंद्रा उपस्थित होते. चौथरा व मंदिर परिसरात चाहत्यांनी सेल्फी घेण्यासाठी व हस्तांदोलन करण्यासाठी गर्दी केल्याने सुरक्षारक्षकांना कसरत करावी लागली.

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीची आज मतमोजणी

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly By Election) झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत...