Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याऔरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यात सत्तापालट झाली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली…

- Advertisement -

त्याआधी शेवटच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने (Thackeray Government) नामांतराचे निर्णय घेतले होते. औरंगाबादचे (Aurangabad) नाव संभाजीनगर (Sambhajinagar), उस्मानाबादचे (osmanabad) नाव धाराशिव (dharashiv) आणि नवी मुंबई विमानतळाला (new mumbai airport) दि. बा. पाटील विमानतळ (di ba patil airport) नाव देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता.

आता या निर्णयाला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. बहुमत चाचणी सिद्ध करायचे पत्र राज्यपालांनी दिल्यानंतर असे लोकप्रिय आणि धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप नोंदवत स्थगिती देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याआधीही याच मुद्द्यावरून आक्षेप घेतला होता. आता हे तिन्ही नामांतराचे निर्णय पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार नव्याने घेणार असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या