Saturday, May 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशिंदेगटाच्या आमदाराचा महायुतीला घरचा आहेर; म्हणाले, "सरकारकडून फुटकी कवडीही…"

शिंदेगटाच्या आमदाराचा महायुतीला घरचा आहेर; म्हणाले, “सरकारकडून फुटकी कवडीही…”

जळगाव | Jalgaon
महायुती सरकारमध्ये सगळं आलबेल नाही, अशी चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. महायुतीचे नेते या चर्चांचा इन्कार करत असले तरी आता अनेकांच्या मनातील खदखद समोर येऊ लागली आहे. पाचोऱ्यातील निर्धार मेळाव्यात भाषण करताना किशोर पाटलांनी भारतीय जनता पार्टीवर आगपाखड केली. तसेच महायुतीचे सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाले, तरी अद्याप एकही रुपयाचा निधी मिळाला नसल्याचे सांगत घरचा आहेर दिला.

आमदारांना महायुती सरकारकडून फुटकी कवडीही मिळाली नाही
महायुतीचे सरकार असले तरी एक फुटकी कवडीही मिळाली नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले. भाजप हा कधीही पलटी मारू शकतो असेही शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी म्हटले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. पाटील यांनी म्हटले की, “आमदारांना महायुतीच्या सरकारकडून एक फुटकी कवडीही मिळाली नाही.” शिवसेनेच्या पाचही आमदारांनी एकजुटीने निर्णय घेतल्यास जळगाव जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेचा अध्यक्ष निवडला जाईल, असाही विश्वास व्यक्त करताना भाजपला इशाराही दिला.

- Advertisement -

एकच आसरा आहे गुलाबराव पाटलांचा
आमदार किशोर पाटील म्हणाले, “आता आम्हाला एकच आसरा आहे तो म्हणजे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा. मी पाचोरा मतदारसंघातील जनतेच्या वतीने गुलाबराव पाटील यांना आवाहनवजा विनंती करणार आहे की ५० टक्के निधी जरी पाचोरा मतदारसंघाला मिळाला तर थोड्याफार प्रमाणात विकासाच्या दृष्टिकोनातून हा मतदारसंघ पुढे जाईल. निश्चितपणे पाचोरा मतदारसंघाला त्याची गरज आहे.

आमदार किशोर पाटील यांनी भाजपमध्ये बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात सहभागी करण्यावरून टीका केली. “चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूरमध्ये सांगितले होते की, बंडखोरी केल्यावर पाच वर्ष हकालपट्टी होईल. त्यावेळेस मी त्यांना फोन करायचो मात्र ते फोन उचलत नव्हते, ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्यावर कारवाई न करता पदाच्या रूपाने त्यांना तुम्ही शाबासकी देत आहात, असे म्हणत त्यांनी बंडखोरांना पक्षात घेण्यावरून भाजपवर टीका केली.

एकनाथ शिंदेंनी नायक चित्रपटाली मुख्यमंत्र्यांसारखे
यावेळी किशोर पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री काळात त्यांनी एक दिवसाच्या नायक चित्रपटातील मुख्यमंत्र्यासारखे काम केले असल्याचे त्यांनी म्हटले. सख्ख्या भावाच्या आधी लाडकी बहीण माझा लाडका भाऊ एकनाथ शिंदे असल्याचे सांगते. एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेत १५०० रुपये मानधन सुरू केले. या १५०० रुपयांचे महत्त्व ग्रामीण भागातील महिलांना माहित असल्याचे त्यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

निदा

Asaduddin Owaisi: सुक्षिशित मुस्लीम मुलामुलींना…;निदा खान प्रकरणावर असदुद्दीन ओवैसींचं भाष्य, म्हणाले,...

0
छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarनाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य महिला आरोपी असलेली निदा खान २७ दिवस फरार होती. अखेर तिला छत्रपती...