Tuesday, November 10, 2026
Homeनगरशिर्डी लोकसभा मतदारसंघात ९ वाजेपर्यंत ६.४१ टक्के मतदान

शिर्डी लोकसभा मतदारसंघात ९ वाजेपर्यंत ६.४१ टक्के मतदान

राहाता | प्रतिनिधी | Rahata

शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha) मतदारसंघात सकाळी ७ ते ९ या दोन तासात सहाही विधानसभा मतदारसंघात सरासरी ६.४१ टक्के मतदान (Voting) झाले. मतदा्रांमध्ये मतदानाबाबत फारसा उत्साह दिसत नाही.

- Advertisement -

आज सकाळी ७ वाजता प्रत्येक्षात मतदानास सुरुवात झाली. ग्रामीण भागात किरकोळ अंतरात रांगा दिसून आल्या. सकाळी ९ अखेर अकोले विधानसभा मतदारसंघात ६.५ टक्के, संगमनेर १०.८७ टक्के, शिर्डी ५.८५ टक्के, कोपरगाव ५.११ टक्के, श्रीरामपूर ५.१७ टक्के, तर नेवासा ५ टक्के असे शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी पहिल्या दोन तासात ६.४१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डीत मतदानाचा हक्क बजावला.

महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत मतदान केले.

ताज्या बातम्या

सतेज

उद्ध्वस्त करतो, बघून घेतो अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाहीत; सतेज पाटलांचे...

0
कोल्हापूर | Kolhapurगोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करताना...