Thursday, July 23, 2026
HomeनगरShirdi : प्रसादात भेसळ; एफडीएचे शिर्डीत पुन्हा धाडसत्र

Shirdi : प्रसादात भेसळ; एफडीएचे शिर्डीत पुन्हा धाडसत्र

निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त करून नष्ट

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईनगरी शिर्डीत (Shirdi) प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या श्रद्धेशी आणि आरोग्याशी खेळ करणार्‍या पेढा (Pedha) व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. साईमंदिर परिसरातील खासगी पेढा विक्री केंद्रे आणि पेढा उत्पादन करणार्‍या आस्थापनांवर टाकलेल्या धाडीत 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा व संशयित पेढा जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला. या पेढ्यांची किंमत सुमारे दोन लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून शिर्डीत प्रसाद (Prasad) म्हणून विकल्या जाणार्‍या पेढ्यांच्या दर्जाबाबत गंभीर तक्रारी समोर येत होत्या. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) यापूर्वीही काही ठिकाणी कारवाई करून नमुने तपासणीसाठी पाठविले होते. मात्र बुधवारी करण्यात आलेल्या व्यापक धाडसत्रात निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांचा मोठा साठाच उघडकीस आल्याने प्रसाद व्यवसायातील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.

- Advertisement -

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी सकाळपासूनच साईमंदिर (Sai Temple) परिसरातील विविध पेढा विक्री केंद्रांवर आणि पेढा उत्पादन (Pedha Production) करणार्‍या ठिकाणी तपासणी मोहीम राबवली. यावेळी मोठ्या प्रमाणावर संशयित पेढा आढळून आल्याने त्याचे नमुने ताब्यात घेण्यात आले. भेसळीचा संशय आणि निकृष्ट दर्जा लक्षात घेऊन सुमारे 600 किलोहून अधिक पेढा नष्ट करण्यात आला.

एफडीएच्या अधिकारी अपर्णा भोईटे यांनी सांगितले, साईमंदिर परिसरात भेसळयुक्त (Adulterated) आणि बनावट पेढ्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. पेढा (Pedha) विक्री केंद्रे तसेच उत्पादन युनिटची तपासणी करून नमुने घेण्यात आले आहेत. भाविकांना दर्जेदार आणि सुरक्षित प्रसाद मिळावा यासाठी प्रशासन सतर्क असून अशी कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. दरम्यान, शिर्डीत लाखो भाविक (Devotee) प्रसाद म्हणून पेढ्यांची खरेदी करतात. त्यामुळे श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे.

केवळ पेढा जप्त (Pedha Seized) करून नष्ट करण्यापेक्षा संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून भेसळखोरांना कायमचा धडा शिकविण्याची मागणी भाविक आणि नागरिकांमधून होत आहे. श्रद्धेच्या प्रसादात भेसळ करणार्‍यांवर प्रशासनाने उगारलेला हा दंडुका स्वागतार्ह असला तरी अशा कारवाया सातत्याने झाल्याशिवाय शिर्डीतील (Shirdi) भेसळीचे रॅकेट पूर्णपणे उध्वस्त होणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २३ जुलै २०२६ – दडपशाहीने प्रश्न कसे सुटतील?

0
लोकशाहीत लोकभावना आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेल्या प्रश्नांकडे डोळेझाक करून चालत नाही, हा इतिहास आहे. नीट पेपर फुटीप्रकरणामुळे आज देशभरातील लाखो तरुण आणि त्यांचे पालक...