Tuesday, September 29, 2026
HomeनगरShirdi bus accident : साईदर्शनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा बसच्या धडकेत मृत्यू

Shirdi bus accident : साईदर्शनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा बसच्या धडकेत मृत्यू

शिर्डी (प्रतिनिधी)

- Advertisement -

साईबाबांच्या दर्शनासाठी कर्नाटकातून शिर्डीत आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा बसच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी आदर्श शाळेजवळ घडली. या घटनेमुळे मेघवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शिर्डीत हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी माहितीनुसार, दिलेल्या कर्नाटकातील मेघवाल कुटुंब साईदर्शनासाठी शिर्डीत आले होते. आदर्श शाळेजवळ कुटुंबियांसोबत रस्ता ओलांडत असताना कु. कृतिका मेघवाल हिला साई गौरी ट्रॅव्हल्सच्या ४० आसनी बसने धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस कर्मचारी संदीप उंदावत व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी मुलीला साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.

रुग्णालय परिसरात चिमुकलीच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. साईदर्शनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या कुटुंबावर क्षणात दुःखाचा डोंगर कोसळल्याने उपस्थित भाविकही भावूक झाले. दरम्यान अपघातातील बस पोलिसांनी ताब्यात घेतली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे करीत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी आणि साई मंदीर प्रशासनाने भाविकांना गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांचा हात कधीही सोडू नये, रस्ता ओलांडताना विशेष काळजी घ्यावी आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...