Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रशिर्डी ड्रेसकोड फलक : रोहित पवार म्हणाले...

शिर्डी ड्रेसकोड फलक : रोहित पवार म्हणाले…

मुंबई –

शिर्डी देवस्थानने दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या ड्रेसकोडसंबंधी एक फलक लावला आहे. याविरोधात

- Advertisement -

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी काही दिवसांपूर्वी देवस्थानच्या पुजार्‍यांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. त्यानंतर आज फलक हटवण्यासाठी तृप्ती देसाई पुण्याहून शिर्डीला निघाल्या असताना त्यांना रस्त्यातच अडवण्यात आले. आता या फलकप्रकरणी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंदिरात जाताना कोणते कपडे घालावेत, हे आपल्या देशाची संस्कृती सांगते. लोकांना ही गोष्ट कळते. मंदिरात जाताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत हे भाविकांना सांगण्याची गरज नाही. असे असूनही आपण मंदिरात फलक लावणार असू तर ती गोष्ट योग्य नाही. आपण कसे वागावे हे आपले संविधान आपल्याया सांगते. संविधानाच्या पलीकडे जाऊन आपली संस्कृतीसुद्धा आपल्याला वर्तनाबाबत योद्य मार्गदर्शन करत असते. अशा परिस्थितीत मुद्दाम कोणी बोर्ड लावत असेल, तर ती गोष्ट योग्य आहे असे मला वाटत नाही, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.

काय आहे फलक प्रकरण

शिर्डीमधील साई मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. येथे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या