Thursday, March 13, 2025
Homeनगरशिर्डीतील वाढलेल्या मतदार यादीचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर

शिर्डीतील वाढलेल्या मतदार यादीचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील लोणी येथील मतदान केंद्र क्रमांक 166 ते 173 मधील लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदार यादीचा अहवाल महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मागवला होता. यानुसार शिर्डी उपविभागीय कार्यालयाने तयार केलेला अहवाल जिल्हा निवडणूक शाखेने निवडणूक आयोगाला सादर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी मतदारसंघातील लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय, लोणी बुद्रुक येथे आठ मतदान केंद्रांवर दहा हजार मतदार आहेत.

- Advertisement -

यापैकी 7 हजार 940 मतदान झाले होते. या केंद्रावर लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान तीन हजार 177 मतदार वाढल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतून दिसून येते. या आठ मतदान केंद्रांवर भाजप उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांना एकूण 6 हजार 941 तर काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांना 901 मतदान झाले होते.संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेला महाराष्ट्रात इंडिया आघाडीला चांगले यश मिळते. मात्र, विधानसभा निवडणुकीत पराभव होतो. लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या काळात 70 लाख नवीन मतदार समाविष्ट करण्यात आले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जितके 5 वर्षांत मतदार जोडले गेले नाहीत तितके शेवटच्या 5 महिन्यांत जोडले गेले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शिर्डी मतदारसंघातील या मतदान केंद्रावरील मतदारांबाबत सोशल मीडियावर आरोप करण्यात आले होते. तसेच काँग्रेस नेते गांधी यांनी देखील याप्रकरणी आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती मागवली होती. त्यानुसार याबाबतचा अहवाल पाठवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...