मुंबई | Mumbai
राज्यातील विधानसभा निवडणूका तोंडावर ठेपल्या आहे. त्यातच आता नवरात्र दोन दिवसावर आली असतानाच सर्वांचे लक्ष शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर लागलेले आहे. दोन वर्षापूर्वी शिवसेनेत फुट पडली आणि दोन शिवसेना उदयास आल्या. पण त्या आधी शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा हा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर भरत आला आहे. पण यंदा कुणाचा दसरा मेळावा गाजणार याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार आहे. बीकेसीमधील मैदानाची जागा निश्चित झाल्याने शिंदे गटाने तयारी देखील सुरु केल्याची माहिती मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा तिसरा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी तब्बल ४० हजार शिवसैनिकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. गेल्या वर्षी आझान मैदानात दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तर पहिला दसरा मेळावा हा बीकेसी येथेच पार पडला होता. मात्र, आझान मैदानात जागेच अडचण, पार्किंगची अडचण लक्षात घेता पुन्हा एकदा बैकेसी मैदानात हा मेळावा होणार असल्याचे समजत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी विविध जागांची चाचपणी केली जात आहे. यानुसार आझाद मैदान आणि बीकेसी या दोन जागांची चाचपणी करण्यात आली आहे. यंदा साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या थीमवर हा कार्यक्रम करण्यात येणार आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा