Friday, September 25, 2026
HomeUncategorizedदरगोडे कुटूंबियांना शिवसेनेचा आधार; भाऊसाहेब चौधरी यांची सांत्वनपर भेट

दरगोडे कुटूंबियांना शिवसेनेचा आधार; भाऊसाहेब चौधरी यांची सांत्वनपर भेट

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

दिंडोरी येथे विहिरीत पडून मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांच्या दरगोडे कुटुंबीयांच्या नातेवाईकांना आज शिवसेनेचे नवनिर्वाचित दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी भेट दिली व सांत्वन केले. शासन दरगोडे कुटुंबीयांच्या पाठीशी आहे असे आश्वासन संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी दिले.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख म्हणून भाऊसाहेब चौधरी यांनी नुकतीच सूत्रे हाती घेतली व त्यानंतर तात्काळ त्यांनी दिंडोरी येथे दौरा केला. दिंडोरी येथील दौर्‍यात इंदोरे येथे जाऊन दरगोडे कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली अपघात कसा झाला ? व त्यानंतर काय काय कार्यवाही झाली? त्याची माहिती घेतली. कुटुंबाला आधार दिला.

आई-वडिलांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला. शासनाची जाहीर केलेली मदत मिळाली किंवा नाही याची माहिती घेतली. कोणतेही अडचण आल्यास भेट घ्यावी असे आवाहन भाऊसाहेब चौधरी यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार धनराज महाले, सहसंपर्कप्रमुख सुनील पाटील, जिल्हाप्रमुख भाऊराव तांबडे, नगरसेवक सुजित मुरकुटे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. दरम्यान,...