Monday, October 14, 2024
Homeब्रेकिंग न्यूजShivneri Sundari : एअर होस्टेसच्या धर्तीवर आता बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी'; एसटी महामंडळाच्या...

Shivneri Sundari : एअर होस्टेसच्या धर्तीवर आता बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’; एसटी महामंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

मुंबई | Mumbai
एअर होस्टेसच्या धर्तीवर आता एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एस. टी. महामंडळाची ३०४ व्या बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष भरत गोगावले यांनी या योजनेला मंजुरी दिली. पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देण्याकरता `शिवनेरी सुंदरी’ नेमली जाणार असल्याचीही माहिती एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी सांगितले.

एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली, या बैठकीत खात्याच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून ७० पेक्षा अधिक विषयांवर चर्चा करुन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या ३४३ बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार असून, अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशां बरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या आणि औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील ४०० ते ५०० चौ.सेमी. ची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तिथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब आणि औषध दुकान सुरू करून सेवा द्यायची आहे.

तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून, या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या २५३ होणार आहे. तसेच एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन१०X१० आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन २५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या