Sunday, July 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: दसरा मेळाव्यात राज-उध्दव एकत्र येणार? संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना...

Sanjay Raut: दसरा मेळाव्यात राज-उध्दव एकत्र येणार? संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण, नेमकं काय म्हणाले?

मुंबई | Mumbai
परंपरेनुसार यंदाच्या वर्षी सुद्धा दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे. कितीही पाऊस असला तरी ठाकरेंचा मेळावा हा याच मैदानावर होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरुन संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे हजर राहणार का या प्रश्नावर उत्तर देताना म्हंटले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आलेले. संवाद साधत आहेत.. दसऱ्याला वैचारिक सोन्याचे अदान-प्रदान होऊ शकते. त्यांना निमंत्रणासाठी परंपरांनी ज्यागोष्टी करायच्या आहेत त्या करू… आमचा संघाचा मेळावा नाही… आमचा मेळावा परंपरेचा आम्ही त्याचे पालन करू. हा देश हिंदूंचा आहे आणि या देशात हिंदूत्ववाद राहणार असल्याचे ठणकावून सांगताना संजय राऊत दिसले.

- Advertisement -

गेल्या काही महिन्यात दोन्ही ठाकरे बंधू यांच्यातील नातेसंबंध हे चांगले झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यातही राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात, अशी सुद्धा चर्चा आहे. त्यावर राऊत पुढे म्हणाले, राज ठाकरे येणार असतील तर त्यात व्यथीत होण्यासारखे काय आहे? जनतेत अशी सकारात्मक चर्चा असेल, तर ते चांगले आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहे. महाराष्ट्रहितासाठी त्यांच्यात चर्चा आणि संवाद होत आहे.

आमच्या परंपरेप्रमाणे ज्या गोष्टी आहेत, त्या आम्ही करू. आमचा मेळावा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा नाही, कमलताई गवई यांचे नाव टाकून त्यांना बोलावले, यांना बोलावले, त्यांना बोलावले, काँग्रेसवाल्यांना बोलावले, असे आम्ही करत नाही. आमचा दसरा मेळाला ही परंपरा आहे, त्या परंपरेचा पालन केले जाईल, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा कधीही खंडीत होत नाही, असे म्हणत यावेळी राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

तर राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यावरुन टीकास्त्र सोडले, गुजरात, सूरत, अहमदाबाद याठिकाणी जाऊन शिंदेंनी त्यांचा दसरा मेळावा घ्यायला पाहिजे. इथे कशाला ढोंग करत आहात. कोण आहात तुम्ही? असेही राऊतांनी म्हटले. त्यांच्या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहा यांना बोलावले पाहिजे. आता त्यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच आयोजित केल्याने ते निशान ए पाकिस्तान आहेत. मात्र, मुंबईतील दसरा मेळावा हा हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पंरपरेनुसार शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार आहे, इतर सर्व बोगस आहे. ते सर्व सडके धान्य आहे, त्यांनी गुजरातमध्ये मेळावे घ्यावे, ते इथे नाटके कशाला करत आहेत, असा टोलाही राऊतांनी शिवसेना शिंदे गटाला लगावला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खरमरीत...

0
नवी दिल्ली | New Delhi दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट परीक्षेचा (Neet Exam) पेपर फुटीच्या कारणावरून आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर...