Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशिवसेना फुटीवेळी शिंदेंच्या आमदाराने ५० कोटी घेतले; भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ

शिवसेना फुटीवेळी शिंदेंच्या आमदाराने ५० कोटी घेतले; भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ

धाराशिव | Dharashiv
शिवसेना पक्षात उभी फूट पडली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या प्रत्येक नेत्याला ५० कोटी रूपये दिल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला. संतोष बांगर शिंदेंसोबत गुवाहाटीमध्ये गेले नव्हते. पण अखेरच्या क्षणी अविश्वास ठरावाच्या वेळी बांगर यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता याला भाजपच्या आमदाराने दुजोरा दिल्याचे दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीतीलच भाजपा आणि शिंदेसेना यांच्यात कुरघोडी सुरू आहे. त्यात भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी ५० खोक्याचा प्रकार खरा असल्याचा दावा केला आहे.

आमदार तानाजी मुटकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी केलेले विधान गंभीर असले तरी ते खरे आहे. मला इतरांचे माहिती नाही, परंतु संतोष बांगर यांना ५० कोटी मिळाले हे माहिती आहे. आदल्या दिवसापर्यंत ते रस्त्यावर उतरून लोकांना ठाकरेंसोबतच राहण्याचे सांगत होते, परंतु अचानक त्यांना स्वप्न पडले आणि ते ५० कोटी घेऊन पळाले. एकनाथ शिंदेंच्या माणसाकडून ते पैसे बांगर यांना मिळाले असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

- Advertisement -

पन्नास खोके ही घटना सत्य आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदेंकडून पन्नास कोटी रुपये घेतले आहेत, असा दावा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू झालाय. हिंगोलीमध्येही बांगर आणि मुटकुळे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आता भाजप आमदाराने संतोष बांगर यांच्यावर ५० कोटींचा गंभीर आरोप केला आहे.

हिंगोलीच्या नगराध्यक्षपदाच्या जागेवर भाजपचा दावा सांगितला जात असताना आमदार संतोष बांगर यांनी येथील निवडणुकीत उडी घेऊन शिंदेसेनेच्या वतीने नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी उमेदवार उभे केले. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेत सुरुवातीपासूनच वादाची ठिणगी पडली.

दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर आणि भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांच्यात अनेक वेळा आरोप-प्रत्यारोप झाले. त्यात तानाजी मुटकुळे यांच्या आरोपामुळे शिंदेसेनेवर विरोधकांनी केलेले आरोप सत्य निघाले अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

२५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

0
येवला | प्रतिनिधी एका २५ वर्षीय विवाहितेने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील वाघाळे येथे घडली. या प्रकरणी पती, सासरे आणि सासू...