नवी दिल्ली | New Delhi
दिल्लीत हिवाळी अधिवेशन सुरू असून संसदेत संविधानाला (Constitution) ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान संसदेत (Parliament) आज मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. यावेळी भाजपाकडून संविधानावर २४ तास हल्ले सुरू असल्याची जोरदार टीका राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आली. उत्तर प्रदेशमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा देखील राहुल गांधी यांनी संसदेत मांडला. उत्तर प्रदेशमध्ये संविधान लागू नसल्याचे देखील थेट राहुल गांधींनी म्हटले. त्यावर सत्ताधारी पक्षाकडून जोरदार प्रहार करण्यात आला.
राहुल गांधी यांच्या भाषणानंतर शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे भाषणासाठी उभे राहिले. यावेळी त्यांनी
संविधानावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आजी इंदिरा गांधी यांचे एक पत्र वाचून दाखवले. इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांना देशाचे ‘महान सपूत’ असे संबोधले होते. मग इंदिरा गांधी (Indira Gandhi) या संविधान विरोधी होत्या का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. श्रीकांत शिंदेंच्या या सवालानंतर मोठा गदारोळ बघायला मिळाला.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, संविधानामुळे एक गरिब घरातील व्यक्ती पंतप्रधान झाला. संविधानामुळे एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला. यावेळी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी संविधानावरील चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी आणि सावरकर यांच्याबाबत भूमिका जाहीर करावी असे आव्हान दिले. राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांचा होणारा वारंवार अपमान मान्य आहे का असा सवाल खासदार डॉ. शिंदे यांनी शिवसेना उबाठाला केला. विरोधकांनी रिकामी पानांचे संविधान हातात घेऊन लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हने मते मिळवली. असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.
श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, जनतेने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) ४०० वरुन ४० वर आणले.आजपर्यंतच्या इतिहासात काँग्रेसने कायमच संविधानाचा अपमान केला आहे. काँग्रेसचा सुरुवातीपासून डॉ. बाबासाहेबांना विरोध होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव करण्याचे काम काँग्रेसने केले. काँग्रेसच्या काळातच देशात शिख बांधवांचे खून झाले. तसेच कारसेवकांवर गोळीबार करण्याचे काम काँग्रेसच्या काळात झाले. मुंबईमध्ये देखील बॉम्बस्फोट काँग्रेसच्या काळात झाले होते, असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला.