मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) २३४ जागा जिंकून महायुती (Mahayuti) राज्यातील सर्वात मोठी युती ठरली आहे. या यशानंतर महायुतीकडून राज्यात सरकार स्थापनेच्या दिशेने पावले टाकण्यात येत आहेत. मात्र, निवडणुकीचा निकाल लागून आज तब्बल आठ दिवस होऊन गेले तरीही महायुतीचे सरकार (Mahayuti Government) स्थापन होऊ शकलेले नाही. यातच मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? या पदाबाबत सस्पेंस कायम आहे. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महायुतीकडे राज्याचे गृहखातं मागितल्याची चर्चा आहे. मात्र, गृहखातं देण्यास भाजपाचा विरोध असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
यातच एकनाथ शिंदे हे दोन दिवस साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी गेले होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावर काल एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत आपण नाराज नसल्याचे सांगितले होते.दुसरीकडे भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याने एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. मात्र त्यांनी ती ऑफर धुडकावल्याची चर्चा आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. अखेर या चर्चेवर खासदार शिंदे यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून पोस्ट करत स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला आहे.
डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री (CM) मा. श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत.लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती.
हे देखील वाचा : Rain Update News : ‘फेंगल’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका; ‘या’ जिल्ह्यांत पाऊस कोसळण्याचा अंदाज
मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो.माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे.माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा”, असे त्यांनी म्हटले आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला
श्रीकांत शिंदेंच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या नावाच्या चर्चांवर एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?
उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंचं नावाची चर्चा आहे? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना काल माध्यमांनी विचारला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले होते की, “अजून चर्चा सुरु आहेत. तुम्हीच (माध्यमात) चर्चा करत असतात. तुमच्या (माध्यमाच्या) चर्चा जास्त असतात. त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो की या सर्व चर्चा आहेत. आमची अमित शाह यांच्याबरोबर चर्चा झाली. यानंतर आता आमच्या तिघांमध्ये (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार) एक बैठक होईल. या बैठकीत आमची साधक बाधक चर्चा होईल”, असे त्यांनी सांगितले होते.