Wednesday, June 10, 2026
HomeनगरShrirampur : महाराजांच्या शिफारशीवरून श्रीरामपुरात उमेदवारी - मुरकुटे

Shrirampur : महाराजांच्या शिफारशीवरून श्रीरामपुरात उमेदवारी – मुरकुटे

कांबळे आणि मुरकुटेंनी मदत केली असती तर आपला आमदार असता-बेग

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शिवसेना (शिंदे गट) शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या पक्ष निरीक्षक खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूर तालुक्यातील पदाधिकार्‍यांची पहिलीच महत्त्वपूर्ण बैठक काल शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत पक्षातील अंतर्गत समन्वय, अलीकडील निवडणुकांतील कामगिरी आणि उमेदवार निवडीच्या प्रक्रियेवर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

बैठकीस माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हाप्रमुख नितीन औताडे, प्रकाश चित्ते, नगरसेवक आकाश बेग, महिला व बालकल्याण सभापती मंजुश्री मुरकुटे, शहराध्यक्ष उमेश पवार, युवक जिल्हाध्यक्ष शुभम वाघ यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अनेक पदाधिकार्‍यांनी पक्ष निरीक्षकांसमोर तक्रारींचा पाढा वाचत स्थानिक पातळीवरील अडचणी मांडल्या. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी तालुका व शहराचा आढावा घेतला. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करताना, त्यांनी वरिष्ठ नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली. स्थानिक परिस्थितीची पाहणी न करता बाहेरच्या (महाराजांच्या) शिफारशीवरून उमेदवारांची निवड करण्यात आली. शहरात जनाधार नसलेल्या व्यक्तींना तिकीट देण्यास भाग पाडल्याने नगराध्यक्षपद गमवावे लागले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुका कोर कमिटी स्थापन करून, तिच्या माध्यमातूनच उमेदवार निश्चित करावेत, तसेच कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये, अशी स्पष्ट भूमिका मुरकुटे यांनी मांडली. दरम्यान, नगरसेवक आकाश बेग यांनीही आपली भूमिका मांडताना मागील विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केला. अपक्ष उमेदवार सागर बेग यांना कोणताही मोठा पाठिंबा नसतानाही, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पाठबळामुळे त्यांना लक्षणीय मताधिक्य मिळाले, असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आणि भानुदास मुरकुटे यांची मदत मिळाली असतीतर आमदार आपला असता असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

या बैठकीत शहर व तालुक्यातील पक्ष संघटनेची सद्यस्थिती, कार्यकर्त्यांमधील नाराजी आणि आगामी निवडणुकांसाठी आवश्यक धोरणात्मक बदल यावर सविस्तर चर्चा झाली. पक्ष निरीक्षक खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी सर्वांच्या तक्रारी ऐकून घेत, संघटना अधिक बळकट करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याच्या येथील पदाधिकार्‍यांना सूचना केल्या.

चित्ते बैठक सोडून बाहेर
नगरपालिका निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करत असताना माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे भाषण सुरू होते. याच दरम्यान नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविलेले प्रकाश चित्ते बैठकीतून बाहेर पडले. त्यामुळे बैठकीत हा चर्चेचा विषय ठरला.

ताज्या बातम्या

Nashik Trimbakeshwar Crime News : त्र्यंबकेश्वरमध्ये चार हॉटेल्सवर गुन्हे; ग्राहकांच्या नोंदी...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) सुरक्षेचा मोर्चा हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिकांकडे वळवला आहे. पोलिस अधीक्षक डॉ....