Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBMC Elections: शिवसेना ठाकरे गटाचे पहिले २८ उमेदवार ठरले; रात्री मातोश्रीवर उमेदवारांना...

BMC Elections: शिवसेना ठाकरे गटाचे पहिले २८ उमेदवार ठरले; रात्री मातोश्रीवर उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, कोणा कोणाची लागली वर्णी?

मुंबई | Mumbai
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणुका पार पडणार आहे. त्याअनुशंगाने सध्या उमेदवरी अर्ज दाखल करणे सुरु आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्यामुळे इच्छुक उमेदवारांची धांदल उडाली आहे. राजकिय पक्षांनी काल पासून यादी जाहीर करण्यास सुरवात केली आहे. त्यातच, शिवसेना-मनसे युतीकडून आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून रविवारी रात्रीपासून एबी फॉर्म वाटप करायला सुरुवात झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल रात्री अनेक उमेदवारांना मातोश्रीवर बोलावून स्वत:च्या हाताने एबी फॉर्म वाटले आहे.

रविवारी रात्री काही उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले तर आज सकाळी ११ वाजल्यापासून उर्वरीत वॉर्डमधील अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. एबी फॉर्म वाटपाची ही प्रक्रिया अतिशय गुप्तपणे सुरु आहे. बंडखोरी टाळण्यासाठी अशी दक्षता घेतली असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळता यावी यासाठी उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधी एबी फॉर्म देऊन अर्ज भरण्याचे सूचना या पक्षाकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणाकोणाला एबी फॉर्म देण्यात आले आणि कोण कोण ठाकरे यांच्या शिवसेनेचे संभाव्य उमेदवार असतील याची काही नावं समोर आली आहेत.

- Advertisement -

मुंबईतील २८ उमेदवार ठरले
प्रभाग क्रमांक ५४- अंकित प्रभू
प्रभाग क्र. ५९- शैलेश फणसे
प्रभाग क्र. ६०- मेघना विशाल काकडे माने
प्रभाग क्र. ६१ सेजल दयानंद सावंत
प्रभाग क्र. ६२ झीशान चंगेज मुलतानी
प्रभाग क्र. ६३ देवेंद्र (बाळा) आंबेरकर
प्रभाग क्र. ६४ सबा हारून खान
प्रभाग क्रमांक ४०- सुहास वाडकर
प्रभाग क्रमांक २०६- सचिन पडवळ
प्रभाग क्रमांक ९३-रोहिणी कांबळे
प्रभाग क्र. १०० साधना वरस्कर
प्रभाग क्र. १५६ संजना संतोष कासले
प्रभाग क्र. १६४ साईनाथ साधू कटके
प्रभाग क्र. १६८ सुधीर खातू वार्ड
प्रभाग क्र. १२४ सकीना शेख
प्रभाग क्र.१२७ स्वरूपा पाटील
प्रभाग क्र- ८९ गितेश राऊत
प्रभाग क्र- १४१- विठ्ठल लोकरे
प्रभाग क्र – १४२- सुनंदा लोकरे
प्रभाग क्रमांक १३७- महादेव आंबेकर
प्रभाग क्र-१३८- अर्जुन शिंदे
प्रभाग १६७ – सुवर्णा मोरे
प्रभाग १५०- सुप्रदा फातर्फेकर
प्रभाग क्र ९५ – चंद्रशेखर वायंगणकर
प्रभाग क्र २१५- किरण बालसराफ
प्रभाग क्र २१८- गीता अहिरेकर
प्रभाग क्र २२२- संपत ठाकूर
प्रभाग क्र २२५- अजिंक्य धात्रक

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून सभासद संस्थांच्या (सेवा सोसायट्यांच्या) प्रतिनिधींचे ठराव 17...