मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री पंतप्रधान यांना भेटले ते म्हणले प्रस्ताव पाठवा मदत देऊ., तुम्हाला समोर परिस्थिती दिसत असताना प्रस्ताव पाठवा काय म्हणताय? दयावान पंतप्रधान यांच्यासोबत काय चर्चा केली. मी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो की शेतकऱ्यांना मदत करा, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन मागणी केली आहे. मराठाड्यातील शेतकर्यांची भेट घेऊन परतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत एकूण परिस्थितीची माहिती दिली.
काय म्हणाले उध्दव ठाकरे?
यावेळी ते म्हणाले की, मी नुकताच धाराशिव आणि लातूर येथे पूरग्रस्त पाहणी दौरा केला, अतिशय विदारक परिस्थिती आहे. पीकं हाताशी आले होते, ते पूर्ण नष्ट झाले आहेत. शेतामध्ये चिखल झाला होता, यावेळी शेतकरी आपुकलीने मला बोलले. तुम्ही जी कर्जमाफी केली तशी कर्जमाफी आता करायला सांगा. सरकारने दिलेली आणि जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे, जमीन पीक घेण्यायोग्य करावी लागणार आहे, त्याला 2 ते 3 वर्ष लागतील. त्यासाठी, १ एक्कर ला ५ लाख रुपये खर्च लागणार आहे. मेहनत आणि खर्च दोन्हीही यासाठी लागणार आहे. शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज आहे, तो आता फेडणार कसे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थिक करत केंद्र आणि राज्य सरकारकडे शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीची मागणी केली आहे.
आम्ही पंचांग काढून नाही बसलो
उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या दोन-तीन वर्षातील १४ हजार कोटींची जाहीर केलेली मदत अजूनही सरकारपर्यंत पोहचली नाही. २०१७ च्या कर्जमाफीची अजूनही प्रतिक्षा आहे. त्यानंतर आमचे सरकार आले, मी कर्जमुक्ती केली. इतरही वेळेला संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून नाही बसलो. मला यात राजकारण आणायचे नाही, पण जर केवळ शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या, त्यांना मदत करा, यामध्ये मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल तर त्यांनी ते जरूर राजकारण समजावे.
पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची वह्या-पुस्तकं वाहून गेली आहेत, ती घ्यायची कशी? असा प्रश्न त्यांच्यासामोर आहे. गावातील 31 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली, त्यावर कर्ज होतं 2 लाखांचे. माझ्याकडे कागदं आहेत, १४ हजार कोटी रुपये मदत अजूनही शेतकऱ्यांकडे पोहोचली नाही. राज्यात मार्च 2023 पासून 13 हजार कोटींची जाहीर झालेली रक्कम शेतकऱ्याला अद्यापही मिळालेली नाही, त्यामुळे कर्जमाफी सरसकट करावी ही आमची मागणी आहे.
समोर दिसतय तर चर्चा कसली करता?
“शेतकऱ्याला सरसकट कर्जमुक्त करा. पंजाबमध्ये हेक्टरी ५० हजार रुपये कालबद्ध मदत तिथल्या सरकारने शेतकऱ्याला जाहीर केली. याला म्हणतात सरकार. पंतप्रधानांनी पंजाबला १६०० कोटी आणि हिमाचलला १५०० कोटीची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातही हेक्टरी शेतकऱ्याला ५० हजार रुपये मदत द्या. महाराष्ट्रात डबल इंजिनच सरकार आहे. मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले, परिस्थितीवर चर्चा केली. समोर दिसतय तर चर्चा कसली करता. दयावान पंतप्रधानांनी प्रस्ताव पाठवायला सांगितला. समोर दिसतय तर प्रस्ताव कसला पाठवायचा?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
भाजपला प्रशासन चालवता येत नाही, आता कोरोनाचे उणे दुणे काढायचे नाही नाही काढायचे असतील तर मी चर्चा करायला तयार आहे, पण आता गरज आहे शेतकऱ्यांना मदतीची. पीएम महाराष्ट्रमध्ये येत आहेत, त्यांनी पीएम केअर फंडातून 50 हजार कोटींची मदत जाहीर करावी. पीएम केअर फंड आहे ना, महाराष्ट्रातून मोठा पैसा त्याच्यात आहेत. मग, पीएम केअर कोणाची करतात? असा सवालही ठाकरेंनी विचारला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





