Saturday, May 2, 2026
Homeमहाराष्ट्रStudent ST Bus Pass : समृद्धी महामार्गावर प्रवाशांची सुरक्षा धोक्यात; लुटमारीचा व्हिडिओ...

Student ST Bus Pass : समृद्धी महामार्गावर प्रवाशांची सुरक्षा धोक्यात; लुटमारीचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई । Mumbai

समृद्धी महामार्गावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. छत्रपती संभाजीनगर ते नागपूर दरम्यानच्या मार्गावर रात्री अज्ञात लोकांकडून वाहनांवर दगडफेक करून लुटमारीचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

या संदर्भातील एक धक्कादायक व्हिडिओ भाजप नेत्या रोहिणी खडसे यांनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर रविवारी शेअर केला. यानंतर सोमवारी तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बोगद्याजवळ काही अज्ञात व्यक्ती वाहनांवर दगडफेक करताना स्पष्ट दिसत आहेत. यामागचा उद्देश वाहन थांबवून प्रवाशांकडून लुटमार करणे असा असल्याचे समजते. एका घटनेत चालकाने प्रसंगावधान राखत गाडी न थांबवता पुढे नेल्यामुळे अनर्थ टळला. मात्र, अशा घटनांमुळे समृद्धी महामार्गावर रात्री प्रवास करणे धोकादायक ठरू लागले आहे.

https://x.com/Rohini_khadse/status/1934484847495631007

सुरक्षेचे उपाय अपुरे पडतायत?

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या माहितीनुसार, महामार्गाच्या प्रत्येक टप्प्यावर ठरावीक वेळेच्या अंतराने गस्त करणारी सुरक्षा वाहने, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १० सदस्यीय पथक, रुग्णवाहिन्या आणि क्विक रिस्पॉन्स व्हेईकल्स (QRV) तैनात आहेत. मात्र, या यंत्रणांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे या घटनांमधून स्पष्ट होते.

कुठल्याही लूटमारीच्या घटनेची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात नोंदवावी लागते. हायवेवर सुरक्षा पोलिस असूनही तक्रारी थेट त्यांच्या कडे नोंदवता येत नाहीत, हे ही एक अडचणीचं कारण ठरतं आहे.

कोणत्या भागात अधिक घटना?

समृद्धी महामार्गासाठी छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर आणि जालना जिल्ह्यांतील ८६ गावांमधून भूसंपादन करण्यात आले होते. याच भागांमध्ये लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हर्सूल-सावंगी, लासूर स्टेशन, माळीवाडा, वैजापूर आणि बोगद्यांच्या परिसरात या घटनांची वारंवारता जास्त आहे. या घटनांनंतर स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट करण्याची मागणी होत आहे. विशेषतः रात्री गस्त वाढवणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या व कार्यक्षमता वाढवणे, आणि आपत्कालीन प्रतिसाद वेळ कमी करणे या बाबींवर भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

 

ताज्या बातम्या

Womens T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला...

0
मुंबई | Mumbai एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर मात करून ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष टी-२० विश्वचषकावर (Womens T20 World Cup...