Thursday, March 13, 2025
HomeनाशिकMalegaon : तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

Malegaon : तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शासकीय कामासाठी आवश्यक असलेले जातीचे दाखले तसेच शिधापत्रिका मिळत नसल्याने योजनासह स्वस्त धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. या संदर्भात अधिकार्‍यांकडे अर्ज व निवेदने देवून देखील दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या उंबरदे, मळगाव, कळवाडी, नरडाणे, देवघट गाव परिसरातील नागरीकांनी आज लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय इमारतीवर चढत शोले स्टाईल आंदोलन छेडत खळबळ उडवून दिली.

- Advertisement -

दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस व महसुल विभागाच्या अधिकार्‍यांनी तहसील कार्यालय इमारतीकडे धाव घेत आंदोलकांना उड्या मारण्यापासून विनंती करत परावृत्त केले. आवश्यक कागदपत्रे त्वरीत उपलब्ध करून देण्यात येतील यासाठी आपण स्वत: लक्ष घालू, असे आश्वासन प्रांत नितीन सदगीर यांनी दिल्यानंतरच तब्बल दोन तासानंतर संतप्त आंदोलक तहसील इमारतीवरून खाली उतरल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.

तालुक्यातील उंबरदे, मळगाव, कळवाडी, नरडाणे, देवघटसह पंचक्रोशीत वास्तव्यास असलेल्या गोरगरीब आदिवासी नागरीकांकडे शासन योजना लाभासाठी आवश्यक असलेले जातीचे दाखले, शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड आदी कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना विविध योजनांच्या लाभापासून गत अनेक वर्षांपासून वंचित राहावे लागत आहे. स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे उलटली तरी या गोरगरीबांना अद्याप मुलभूत सुविधा देखील मिळू शकलेल्या नाहीत. बहुतांश ग्रामस्थ अशिक्षित असल्यामुळे त्याचा लाभ उठवत दाखल्यासाठी आठ ते दहा हजार रूपयांची मागणी दलालांतर्फे केली जाते व नंतर ते पैसे घेवून फरार होत असल्याने गोरगरीबांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप शेखर पगार यांनी यावेळी बोलतांना केला.

दाखल्यांअभावी शबरी माता घरकुल, रमाई माता घरकुल योजना, कृषि विभाग तसेच इतर शासकीय योजनांपासून हे गोरगरीब नागरीक-आदिवासी वंचित राहत आहे. महसुल यंत्रणेकडे अनेक वर्षापासून चकरा मारून देखील जातीचे दाखले व शिधापत्रिका त्यांना दिल्या जात नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांचे या समस्येकडे लक्ष जावे व त्यांनी तातडीने सकारात्मक निर्णय घेत दाखले व शिधापत्रिका उपलब्ध करून द्याव्यात यासाठी हे आंदोलन छेडण्याची वेळ आल्याचे पगार यांनी सांगितले.

या आंदोलनात सुकदेव दळवी, रमेश पवार, भारत गांगुर्डे, सुमन सोनवणे, कलाबाई दळवी, धनाबाई कुंवर, शिवाजी पवार आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...