Thursday, October 1, 2026
Homeनगर"लघुशंका करू नका" म्हणाल्याचा राग; जामखेडमध्ये तरुणावर गोळीबार

“लघुशंका करू नका” म्हणाल्याचा राग; जामखेडमध्ये तरुणावर गोळीबार

जामखेड | तालुका प्रतिनिधी
जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी (दि. १ जून) रात्री साधारण १० वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक गोळीबाराची घटना घडली. तीन अज्ञात व्यक्ती लघुशंका करत असताना, फिर्यादीने “येथे लघवी करू नका, महिला आहेत” असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारावर गोळीबार केला. या हल्ल्यात साक्षीदाराच्या पायाला गोळी लागली असून, त्याला अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाला सुरुवात केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत.

- Advertisement -

नेमकं काय घडले?
जामखेड येथील पोकळे वस्तीतील रहिवासी आदित्य बबन पोकळे (वय २०, व्यवसाय: वॉशिंग सेंटर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री १० वाजता विंचरणा नदीजवळ त्याच्या घरासमोर काही महिला आणि नागरिक बसले होते. यावेळी एका चारचाकी वाहनातून उतरलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी तिथे लघुशंका करण्यास सुरुवात केली. आदित्यने त्यांना “येथे लघवी करू नका, महिला आहेत” असे सांगितले. याचा राग आल्याने त्या तिघांनी आदित्यला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तिथे आलेल्या कुणाल बंडू पवार (वय २०, रा. जामखेड) याच्यासह आदित्यवर आरोपींनी पिस्तूलातून गोळीबार केला. कुणालच्या पिंढरीतून गोळी आरपार गेली, त्यामुळे त्याला प्रथम जामखेड येथील खाजगी रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले.

पोलिसांचा तपास सुरू
घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेल्या कारच्या नंबरवरून तपास सुरू केला असून, तीन पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले की, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.

आमदार रोहित पवार यांचे ट्विट
या गोळीबाराच्या घटनेमुळे जामखेड शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले,
“मतदारसंघातील आणि एकूणच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मी कायम आवाज उठवत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही. जामखेडमध्ये रात्री सव्वा दहाच्या सुमारास एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाला असून, तो गंभीर जखमी झाला आहे. अशा घटनांमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत आहे. सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी सरकारने या गुंडगिरीला चिरडून टाकावे, ही विनंती!”
पुढील तपास सुरू

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तीव्र केला असून, लवकरच आरोपींना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : खासगी शाळांमधील शिक्षकांची टीईटी पात्रता आता तपासणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील सरकारी शाळांनंतर आता शिक्षण विभागाने खासगी, विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील शिक्षकांच्या पात्रतेवर लक्ष केंद्रित केले आहे. या शाळांमध्ये काम करणारे शिक्षक...