Monday, September 16, 2024
Homeक्राईमदुकानातून कपड्यांची चोरी आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत

दुकानातून कपड्यांची चोरी आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

शहरातील दुकानातील कपडे चोरीतील आरोपीकडून 12 हजार 500 रुपये किंमतीचे कपडे जप्त करण्यात आले. श्रीरामपूर शहर पोलिसांनी सदर आरोपीस ताब्यात घेवून कामगिरी पार पाडली. दि.06 ऑगस्ट रोजी फिर्यादी आसाराम बालगोविंद शुक्ला (वय 70) हे त्यांच्या महात्मा गांधी पुतळा येथे असलेले शुक्ला साडी सेंटर दुकानात बसले असताना दुपारी एक अनोळखी इसम त्यांच्या दुकानात शिरला. त्याने त्यांच्या दुकांनातील दोन साडीचे गठ्ठे, एक लेडीज सनकोटचा गठ्ठा, एक लेडीज ब्लाऊज पिसचा गठ्ठा असा एकूण 12 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल घेऊन पळून गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर गुन्ह्यातील गेलेला मालाचा व आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. तपास पथकाने तत्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. गेलेल्या मालाचा शोध घेतला असता सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी शाहरुख ऊर्फ चपट्या शेख याने केला असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीचा शोध घेत असताना तो बसस्टॅण्ड परिसरात आला असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला, पोलीस पथकाची चाहुल लागताच तो पळून जाऊ लागला, तेव्हा त्यास तपास पथकाने पाठलाग करून शिताफीने जेरबंद केले. त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने शाहरुख ऊर्फ चपट्या अफसर शेख असे सांगितले. त्याच्याकडे नमुद गुन्ह्याबाबत सखोल तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून वरील वर्णनाचा माल हस्तगत करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या