Friday, September 4, 2026
HomeनगरAhilyanagar : दुकाने व आस्थापना 24 तास खुले ठेवण्यास परवानगी

Ahilyanagar : दुकाने व आस्थापना 24 तास खुले ठेवण्यास परवानगी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

मद्य विक्री अथवा पुरवठा करणार्‍या आस्थापना वगळता राज्यातील इतर सर्व दुकाने व आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस 24 तास सुरू ठेवता येणार आहेत. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. शासनाच्या उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने 1 ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढले असून, स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभाग यांना त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अधिनियमाच्या कलम 16 (1) (ख) नुसार आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस चालू ठेवता येतात, मात्र प्रत्येक कर्मचार्‍यास आठवड्यातून 24 तास सलग विश्रांती देणे बंधनकारक आहे. कलम 2 (2) मध्ये दिवस या संकल्पनेची व्याख्या मध्यरात्रीपासून सुरू होणार्‍या 24 तासांच्या कालावधी अशी करण्यात आली आहे. त्यामुळे, कायद्यानुसार कर्मचार्‍यांना आठवड्याची सुटी दिल्यास दुकाने व आस्थापना अखंड 24 तास सुरू ठेवण्यास कायदेशीर अडचण नाही. शासनाने यापूर्वी 19 डिसेंबर 2017 रोजीच्या अधिसूचनेत राज्यातील परमिट रूम, बिअर बार, डान्सबार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक आणि अशा प्रकारच्या सर्व मद्य विक्री किंवा पुरवठा करणार्‍या आस्थापनांच्या सुरू व बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या होत्या. नंतर 31 जानेवारी 2020 रोजी थिएटर आणि सिनेमा गृह यांना या अधिसूचनेतून वगळण्यात आले. त्यामुळे सध्या केवळ मद्य विक्री/पुरवठा करणार्‍या आस्थापनांनाच रात्रीच्या वेळांवर निर्बंध लागू आहेत.

पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाकडून कायद्यात नसतानाही इतर व्यवसायांना 24 तास सुरू ठेवण्यास प्रतिबंध केला जात आहे अशा तक्रारी गेल्या काही दिवसांत विविध व्यापारी संघटना, आस्थापना मालक आणि लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केल्या होत्या. या तक्रारींवर दखल घेत शासनाने अधिनियमातील तरतुदी स्पष्ट करत सर्व विभागांना मार्गदर्शक सूचना दिल्या असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

ताज्या बातम्या

दै.’देशदूत’चा आज ५७ वा वर्धापनदिन सोहळा

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik जिल्ह्यातील जनसामान्यांच्या मनात गेल्या पाच दशकांहून अधिक काळ अढळ स्थान निर्माण करणार्‍या दैनिक ‘देशदूत’चा ५७ वा वर्धापन दिन आज शुक्रवारी (दि....