Thursday, April 9, 2026
HomeनगरAhilyanagar : सर्वाधिक श्रीगोंद्यात 80 टक्के तर सर्वात कमी श्रीरामपूरमध्ये 67 टक्के...

Ahilyanagar : सर्वाधिक श्रीगोंद्यात 80 टक्के तर सर्वात कमी श्रीरामपूरमध्ये 67 टक्के मतदान

दोन लाख 32 हजार 663 मतदारांनी बजावला हक्क

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मंगळवारी झालेल्या आठ पालिकांच्या निवडणुकीत 72.25 टक्के मतदान झाले. तीन लाख 22 हजार 20 मतदारांपैकी दोन लाख 32 हजार 663 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक मतदान श्रीगोंदा पालिकेत 79.84 टक्के झाले तर सर्वात कमी श्रीरामपूर पालिकेसाठी 66.62 टक्के मतदान झाले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात आठ नगर परिषदांसाठी मंगळवारी मतदान झाले. रात्री उशीरापर्यंत मतदानाची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. सांयकाळी 5 नंतर अचानक मतदान केंद्रांवर गर्दी वाढली. श्रीगोंदा, शेवगाव, संगमनेर या पालिकांमध्ये रात्री साडे आठ नऊ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. रात्री उशीरा मतदान यंत्र जमा झाले. त्यानंतर आकडेवारी एकत्रित करण्यात आली. पालिकानिहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे आहे.

श्रीरामपूर 80 हजार 992 मतदारांपैकी 53 हजार 954 मतदारांनी मतदान केले. म्हणजे 66.82 टक्के मतदान झाले. संगमनेर 72.75 टक्के मतदान झाले असून 57 हजार 771 मतदारांपैकी 41 हजार 988 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राहुरी 33 हजार 270 मतदारांपैकी 24 हजार 109 मतदारांनी मतदान केल्याने 72.46 टक्के मतदान झाले आहे. राहाता 19 हजार 465 मतदारांपैकी 15 हजार 157 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या पालिकेसाठी 77.87 टक्के मतदान झाले.

श्रीगोंदा 28 हजार 326 मतदारांपैकी 22 हजार 615 मतदारांनी मतदान केल्याने या निवडणुकीत सर्वाधिक 79.84 टक्के मतदान झाले आहे. शेवगाव 69.4 टक्के मतदान झाले असून 35 हजार 479 मतदारांपैकी 24 हजार 466 मतदारांनी मतदान केले. जामखेड- 75.63 टक्के मतदान झाले असून 33 हजार 161 मतदारांपैकी 25 हजार 81 मतदारांनी मतदान केले. शिर्डी 33 हजार 613 मतदारांपैकी 25 हजार 263 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी 75.16 टक्के मतदान झाले आहे.

लाडक्या बहिणांचा टक्का कमीच
जिल्ह्यात आठ नगरपरिषदांसाठी मंगळवारी मतदान झाले. एकूण तीन लाख 22 हजार 20 मतदार होते. त्यात 1 लाख 59 हजार 499 पुरुष तर 1 लाख 62 हजार 455 महिला मतदान होत्या. अर्थात महिला मतदारांची संख्या मोठी असल्याने व निवडणुकीत लाडकी बहिण योजनेच्या श्रेयावरून महायुतीमध्ये तीन पक्षात रस्सीखेच सुरू होती. मात्र जिल्ह्यात लाडक्या बहिणांचा मतदाना टक्का कमी दिसून आला. 1 लाख 62 हजार 455 पैकी 1 लाख 14 हजार 191 लाडक्या बहिणींनी मतदान केले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : वकीलाने मागितली डॉक्टर तरूणीकडे दोन लाखांची खंडणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात नोकरीसाठी अर्ज देण्यास आलेल्या एका डॉक्टर तरूणीचा पाठलाग करून, त्यांचे व त्यांच्या बहिणीचे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...