Thursday, March 13, 2025
Homeनगरबिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील आनंदवाडी परिसरातील खरात वस्ती येथील बाळू रायचंद खरात यांच्या पहाटे दोन शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार (Leopard Attack Goat Death) झाल्या आहेत. यामुळे या भागात भितीचे वातावरण तयार झाले आहे. या भागात आतापर्यंत बिबट्याने अनेक हल्ले केले आहेत. त्यात शेतकर्‍यांचे पशूधन मृत्यूमुखी पडलेले आहे.

- Advertisement -

दरम्यान कालच्या बिबट्याच्या हल्ल्यानंतर (Leopard Attack) घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी यांनी येवून पाहणी केली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढले असून बिबट्याच्या हल्लात शेळ्या, मेंढ्या, वासर, कुत्रे याचा बळी जात आहे. नागरी वस्ती परिसरात बिबट्या (Leopard) घुसत असल्याने बिबट्याच्या बंदोबस्तसाठी कायम स्वरूपी पिंजरे बसवावेत, वन विभागाने बिबट्याच्या हल्ल्यात जखमी (Injured) जाणार्‍या मृत पावणार्‍या जनावरांच्या मालकांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...