Friday, October 2, 2026
Homeक्राईमShrirampur : श्रीरामपुरात बंगल्याची खिडकी तोडून चोरी

Shrirampur : श्रीरामपुरात बंगल्याची खिडकी तोडून चोरी

चार चोरटे सीसीटीव्हीत कैद || लाखाचा ऐवज चोरीस

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील कामगार हॉस्पिटल जवळील आनंद पोपटलाल कोठारी यांच्या बंगल्याच्या मागील बाजूच्या खिडकीची चौकट कटावणीच्या साहाय्याने अज्ञात चोरट्यांनी उचकटून रोख रक्कम व चांदीचे पैंजण व अन्य वस्तू असा सुमारे 1 लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवार मध्यरात्री घडली.

- Advertisement -

शनिवारी मध्यरात्री चार अज्ञात चोरटे बंगल्याच्या दर्शनी गेटवरून कंपाऊंडमध्ये घुसले. बंगल्याच्या मागील बाजूच्या खिडकीची चौकट उचकटून घरात प्रवेश करीत रुममध्ये व स्वयंपाक घरातील कपाटातील साहित्याची उचकापाचक करीत सुमारे 20 हजार रुपयांची रोख रक्कम, चांदीचे पैंजण, अन्य वस्तू सुमारे 75 हजारांच्या असा सुमारे 1 लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. आनंद कोठारी हे बेडरुममध्ये झोपलेले होते. त्यांच्या बंगल्या शेजारी खाडे यांचा बंगला आहे. खाडेंच्या कन्येला शेजारच्या बंगल्यातून आवाज आला. त्यांनी आनंद आनंद असा आवाज देताच आनंद यांना जाग आली. रुमचे लाईट लावले असता कोणीतरी जागे झाले असल्याचे लक्षात येताच चोरटे रुमचा दरवाजा उघडून पळून गेले. जातांना रुमला बाहेरील कडी लावून गेले. आनंद कोठारी हे दुसर्‍या दरवाजाने बंगल्याबाहेर आले. त्यांना चार चोरटे पळून जातांना दिसले. त्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला गेले असता चोरट्यांनी गलोलीच्या साहाय्याने दगड मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते पुढे गेले नाही.

बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजमध्ये चार चोरटे दिसत असून त्यांनी तोंडाला रुमाल बांधल्याचे दिसून येत आहे. रात्री कोठारी यांनी पोलिसांना याबाबत माहिती देताच सहायक पोलीस निरीक्षक श्री. निकम व त्यांच्या पथकाने घटनास्थळी येवून पाहणी केली. याप्रकरणी आनंद कोठारी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ताज्या बातम्या

सचिव

MPSC: मोठी बातमी! MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; शासन...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची सचिवपदावरील...