Friday, September 4, 2026
Homeनगरअति उत्साही गो-रक्षकांच्या 'कर्तव्यदक्षते'चा शेतकऱ्याला फटका; नेमकं काय घडलं?

अति उत्साही गो-रक्षकांच्या ‘कर्तव्यदक्षते’चा शेतकऱ्याला फटका; नेमकं काय घडलं?

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

- Advertisement -

गोहत्या रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या काही अतिउत्साही गो-रक्षक कार्यकर्त्यांनी, एका युवा शेतकऱ्याने लोणी येथील जनावरांच्या बाजारातून खरेदी केलेल्या गायी अडविल्या. अन् गायीसह टेम्पो थेट पोलीस ठाण्यात नेला. पण ज्याला पकडला तो स्वतः शेतकरी व एका देशपातळीवरील हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे समजताच ‘वाह, रे! गो रक्षक ? असे म्हणत कपाळावर हात मारण्याची वेळ आली. या प्रकारामुळे या गो पालक शेतकऱ्याला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

भोकर येथील एका युवा दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्याने काल लोणी येथील जनावरांच्या बाजारातून दोन गायी खरेदी केल्या. त्या गायी घेवून तो भोकर येथे घरी येत असताना, दत्तनगर शिवारात एका हिंदूत्ववादी संघटनेच्या अतिउत्साही गोरक्षकांनी तो गायींचा टेम्पो अडविला. ‘तुम्ही गायी कापायला चालविल्या आहे, गाडी पोलीस ठाण्यात घ्या’ अशी धमकी दिली, गडबडलेल्या त्या शेतकऱ्यांने त्याची विनवणी करत ‘आमच्याकडे गायी खरेदीची पावती आहे. माझ्या घरी गायींचा गोठा आहे, हवे तर तुम्ही बघायला चला, आम्ही विक्रेते नाही, आम्ही पण हिंदूच आहोत’ असे सांगितले. त्यानी लागलीच पोलिसांचा ११२ क्रमांक फिरविला, अन् पोलिसांचे चक्र फिरले. गायीसह टेम्पो व मालक शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले.

संबधीत शेतकरी पोलिसांचीही विनवणी करू लागला. पण तेथेही शेवटी तेच घडले. ‘साहेब येवू द्या, मग बघू अखेर संबधीत शेतकऱ्याने भोकर येथील काही प्रमुखांशी संपर्क करत, घडला प्रकार सांगितला. काही वेळात शहर पोलीस ठाण्यात भोकर येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा जमाव जमा झाला. दरम्यानच्या काळात ज्या त्या कार्यकर्त्यांने आपआपल्या नेत्यांना घडला प्रकार विषद केल्याने, संबधीतांनीही शहर पोलीस ठाण्यात नव्यानेच हजर झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्याशी संपर्क केला. अनेक जण तातडीने शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. सर्व प्रक्रीया होऊन अखेर त्या गायी सायंकाळी सात वाजता संबधीत शेतकऱ्यांच्या दारात पोहचल्या.

याच दरम्यान टेम्पो पकडणाऱ्या त्या गोरक्षकांनी पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांची भेट घेतली असता, त्यांनी लागलीच सर्वांसमक्ष यांनी गायी घेतलेला युवा शेतकरी हा देखील आरएसएसचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. अन् तथाकथीत गोरक्षकांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली.

यावेळी पोलीस ठाण्यात भाजपाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश चित्ते, तालुका उपाध्यक्ष भाऊराव सुडके, संघटक सतीष शेळके, शिवसेनेचे सदाशिव पटारे, शिवाजी दोंड, महेश पटारे, सागर शिंदे, सुरेश अमोलीक, संदीप गांधले, माजी पोलीस पाटील बाबासाहेब साळवे, भोकरचे सरपंच पती प्रताप पटारे, भैरवनाथचे प्रविण फरगडे, गणेश जाधव, प्रसाद ओहोळ, हनुमान पांढरे, लक्ष्मण मते, प्रसाद शेळके, अतुल आबुज, महेश मते, सुनिल साळवे आदी उपस्थित होते. या प्रकारात शहर पोलीस ठाण्याचे ठाणे अमलदार संतोष परदेशी यांनी मोलाचे सहकार्य केले.

ताज्या बातम्या

default-featured-image

Pathardi : दुष्काळ सदृश्य परिस्थितीतही विहीर तुडुंब !

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi श्रीक्षेत्र भगवानगडाच्या पायथ्याशी नागलवाडी-बोधेगाव रस्त्यालगत डोंगराच्या कुशीत भगवानगडाच्या शेतजमिनीला लागून असलेली विहीर सध्या परिसराचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून...