Sunday, May 24, 2026
HomeनगरFake finance company scam : कमी व्याजदरात कर्जाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची लाखोंची...

Fake finance company scam : कमी व्याजदरात कर्जाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

तालुक्यातील बेलापूरसह परिसरातील शेतकऱ्यांना कमी व्याजदरात घरकर्ज व पशुखरेदीसाठी कर्ज देण्याचे आमिष दाखवून एका कथित फायनान्स कंपनीने मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुरी येथे तात्पुरते कार्यालय थाटून संबंधितांनी अनेक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला, आणि त्यानंतर त्यांच्याकडून कोरे चेक, कागदपत्रे व बँक खात्यातील रकम उकळल्याचे उघड झाले आहे. बेलापूर येथील एका शेतकन्याला घर बांधणीसाठी तब्बल दहा लाख रुपयांचे कर्ज कमी व्याजदरात मंजूर करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचबरोबर गायी खरेदीसाठीही स्वतंत्र कर्ज मिळेल, असे सांगत संबंधितांनी शेतकऱ्याच्या घरी जाऊन पाहणी केली.

- Advertisement -

कर्ज प्रक्रिया सुरु असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी गायींना बिल्ला मारण्यासाठी आमचा कर्मचारी येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यााने शेजाऱ्याकडील गायी आणून स्वतःच्या घरासमोर बांधल्या. यानंतर संबंधितांनी कर्ज मंजुरीसाठी बँकेचा कोरा चेक आवश्यक आहे, असे सांगून शेतकऱ्याकडून सही केलेला चेक घेतला, तसेच खात्यात किमान ६० हजार रुपये शिल्लक ठेवण्याची अट घातली. दोन दिवसांत कर्ज मंजूर होईल, असे सांगून संबंधितांनी शेतकऱ्याला विश्वासात घेतले. मात्र, काही दिवसांनी संबंधित शेतकऱ्याच्या मोबाईलवर खात्यातून ६० हजार रुपये चेकद्वारे काढल्याचा संदेश आला आणि फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

घाबरलेल्या शेतकऱ्याने तातडीने राहुरी येथील संबंधित फायनान्स कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. मात्र, कार्यालयाला कुलूप लावलेले होते. गाळा मालकाकडे चौकशी केली असता संबंधितांनी काही दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात जागा भाड्याने घेतल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी आणखी १५ ते २० शेतकरी आपली फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन पोहोचले होते.

दरम्यान, या प्रकारामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या बनावट फायनान्स कंपन्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकन्यांच्या अडचणींचा फायदा घेत अशा टोळ्या सक्रिय होत असल्याने प्रशासनाने तातडीने तपास करून संबंधितांबर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

बेलापूर, उक्कलगाव, गळनिंब, कडीत, फल्याबाद, कुरणपूर, मांडवे आदी परिसरातील अनेक शेतकरी अशाच प्रकारे फसवले गेल्याची चर्चा असून या कथित फायनान्स कंपनीने मोठे जाळे उभे केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कमी व्याजद्रात सहज कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या शेतकऱ्यात्मध्ये संतापाचे वातावरण असून संबंधितांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

घटना बेलापूरला घडली. हा शेतकरी तक्रार देण्यासाठी बेलापूर पोलीस चौकीत गेला असता त्याला राहुरीला जाण्याचा सल्ला दिला. फरयाबाद येथील तीन शेतकरी आहेत ते लोणी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले, तेथेही तक्रार घेतली नाही, त्यांनाही राहुरी येथे जाण्यास सांगितले. राहुरी येथे गेले असता घटना जिथे घडली तेथे तक्रार देण्यास सांगितले. अशा प्रकारे पोलिसांकडून या शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरु असल्याने अद्याप गुन्हा दाखल होवू शकला नाही.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलिसांवर हल्ला करणार्‍यांना दोन दिवस पोलीस कोठडी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar तरूणाच्या अपहरण प्रकरणात सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करणार्‍या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...