Tuesday, July 14, 2026
HomeनगरShrirampur : ऑर्डर उशीरा आल्याच्या कारणावरून श्रीरामपूरात हॉटेल मालकाचा खून

Shrirampur : ऑर्डर उशीरा आल्याच्या कारणावरून श्रीरामपूरात हॉटेल मालकाचा खून

श्रीरामपूर |प्रतिनिधी | Shrirampur

श्रीरामपूर शहरातील हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग या ठिकाणी जेवणाची ऑर्डर उशिरा आली या कारणातून लॉजिंगला थांबलेल्या तिघांसह त्यांच्या स्थानिक साथीदारांनी केलेल्या मारहाणीत हॉटेल मालकाचा जागेवरच मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. यात एक आरोपीही जखमी झाला असून त्याचेवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

शहरातील नेवासा रोडवरील हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग या ठिकाणी मुंबईवरून आलेले तिघेजणे दोन ते तीन दिवसांपासून मुक्कामी होते आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याने नशेत असलेल्या तिघांनी याचा वेटरला जाब विचारत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हॉटेल मालक आकाश चंद्रशेखर वेंकटरमन दुबैय्या (वय 34) याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या डोक्यात खुर्ची टाकण्यात आली तर तोंडावर कशाने तरी मारहाण करण्यात आली यामध्ये डोक्यातून रक्तस्राव झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याचा चुलत भाऊ कुणाल कैलास दुबैय्या याच्या डोक्याला किरकोळ जखम झाली. यावेळी परिसरातील काही लोकांनी यातील एक आरोपी सुरज सुरेश जाधव (वय 25) याला परिसरातील काही जणांनी पकडून त्यास बेदम मारहाण केली त्यात तो जखमी झाला आहे.

घटना घडली त्यावेळी आकाशाचे वडील नुकतेच पुण्यावरून आले होते त्यांनी हॉटेलमध्ये काय चालले याची माहिती घेतली असता मारहाणीमध्ये त्यांनी हस्तक्षेप केला असता त्यांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली. जखमींना तातडीने नजीकच्या साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आकाश दुबैय्या हा मयत झाल्याचे साखर कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित करण्यात आले तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत त्यापैकी जखमी सुरज जाधव त्याच्यासह यश जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यश जाधव हा दवाखान्यामधील टॉयलेट मध्ये लपून बसला होता. सुरेश जाधव यांच्यावर साखर कामगार उमेदवार उपचार सुरू आहेत.

पोलीस विभागाची नगरला बैठक असल्याने सर्वाधिक अधिकारी नगर येथे गेलेले होते घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांनी आपल्या फौज फाट्यासह रुग्णालयात भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे फॉरेन्सिक टीमने हॉटेलची तपासणी सुरू केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असून हल्ल्याचे वेळी नेमकी किती जण उपस्थित होते याची माहिती घेतली जात आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सायंकाळी सहा वाजता या गुन्ह्यातील तिसरा आरोपी ओम डफळ यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. हा साखर कामगार रुग्णालयाच्या टेरेसवर होता. पोलिसांनी त्याला तेथून अटक केली. ओम डफळ हा येथील नर्सिंग स्कूलचा विद्यार्थी असून तो तेथील त्याच्या रूममध्ये पोलिसांना आढळून आला.

ताज्या बातम्या

Nashik News : ​ सावळघाटात भीषण अपघात; चार जण ठार, एक...

0
पेठ | प्रतिनिधी Peth नाशिक-पेठ रस्त्यावरील सावळघाटात आज सायंकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. पेठ-दिंडोरी हद्दीलगत एका भरधाव ट्रकचे ब्रेक फेल...