Thursday, July 30, 2026
HomeनगरOnion Rate : श्रीरामपुरात कांद्याला काय मिळतोय भाव ?

Onion Rate : श्रीरामपुरात कांद्याला काय मिळतोय भाव ?

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Shrirampur Market Committee) सोमवारी पार पडलेल्या लिलावात कांद्याला (Onion) 1600 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर कोबी, फ्लावरच्या दररात घसरण झाली. सोमवारी बाजार समितीमध्ये 20772 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली. त्यात एक नंबर कांद्याला 1350 ते 1600 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर दोन नंबर कांद्याला (Onion) 1000 ते 1300, तीन नंबरला 600 ते 950, खादला 250 ते 500 तर गोल्टीला 800 ते 1150 रुपयांपर्यत दर मिळाला.

- Advertisement -

120 क्विटल आवक झालेल्या बटाट्याला 1400 ते 1800, आले (15 क्विटल) 2000 ते 3500, कोबी (10 क्विटल) 600 ते 1000, फ्लावर (12 क्विटल) 700 ते 1100, हिरवी मिरची (23 क्विटल) 2000ते 4000, लसुण (14 क्विटल) 3000 ते 5000, ड्रॅगन फृट (Dragon Fruit) (2 क्विटल) 1500 ते 5500, डाळिंब (Pomegranate) नं.3 (4 क्विटल) 2000ते 4500 तर मोसंबीला 2000 ते 3500 रुपयांपर्यंत दर मिळाला

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पश्चिम महाराष्ट्रासाठी जीवनदायी ठरलेल्या कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे....