Thursday, September 3, 2026
HomeनगरShrirampur : पालिकेत महिला अधिकार्‍यांमध्ये हमरी-तुमरी

Shrirampur : पालिकेत महिला अधिकार्‍यांमध्ये हमरी-तुमरी

निलंबन काळातील बिल अदा न केल्याचे कारण?

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

पालिकेतील लेखा विभागातील एका महिला अधिकार्‍याशी दुसर्‍या विभागातील सहायक पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिकार्‍याने हुज्जत घाताली. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर हमरी-तुमरी, शिवीगाळ, आणि वैयक्तिक चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याच्या प्रकार घडल्याची पालिका कर्मचारी वर्तुळात सुरू आहे. निलंबन काळातील बिल अदा न केल्याचा राग मनात धरून ही हुज्जत घातली असल्याचे समजते.

गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे श्रीरामपूर दौर्‍यावर आले होते. पालिकेतील जवळजवळ सर्व अधिकारी जिल्हाधिकार्‍यांसमवेत क्षेत्र भेटीसाठी गेले होते. यावेळी लेखा विभागात हा प्रकार घडला. दुसर्‍या एका विभागातील सहायक पदावरील सदर महिला अधिकारी काही वर्षांपूर्वी निलंबित झाली होती. त्याकाळातील काही बिले तिने लेखा विभागात सादर केले होती. मात्र, लेखा विभागाने हे बिले अदा करण्यास स्पष्ट नकार दिला. या गोष्टीचा राग आल्याने सदर महिला अधिकारी लेखा विभागात गेली. त्यावेळी उपस्थित असलेल्या जबाबदार अधिकार्‍याशी तिने वाद घातला. हा वाद विकोपाला जाऊन प्रकरण हमरी-तुमरी व वैयक्तिक शिवीगाळापर्यंत गेले.

काही महिन्यांपूर्वी तत्कालिन लेखापाल व सेवा निवृत्त अभियंता यांच्यात जोरदार खडाजंगी होऊन प्रकरण खुर्च्या एकमेकांच्या डोक्यात टाकण्यापर्यंत गेले होते. यावेळी तत्कालिन मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी मध्यस्ती करून प्रकरण सामोपचाराने मिटविले होते. गेल्या काही वर्षापासून पालिकेत प्रशासकीय राज असल्याने अधिकार्‍यांवर कुणाचाही वचक राहिला नसल्यानेच असे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे.

मुख्याधिकार्‍यांचा दुजोरा
संबंधित दिवशी जिल्हाधिकारी आले असल्याने आम्ही त्यांच्या सोबत होतो. त्यादिवशी अशी घटना घडल्याचे माझ्या कानावर आले आहे. मात्र, वादाचे कारण समजले नसल्याचे सांगत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी घटनेस दुजोरा दिला. माझ्याकडे याबाबत लेखी तक्रार आल्यास आपण चौकशी करू असेही श्री.घोलप म्हणाले.

ताज्या बातम्या

Nashik News : आदिवासी विद्यार्थी आंदोलकांशी अभिजित दिपकेंनी भेट देऊन साधला...

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik गोल्फ क्लब मैदानावर गेल्या १२ दिवसांपासून विविध न्याय्य मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे सुरू असलेले प्राणांतिक उपोषण आता राज्य सरकारच्या अडचणी वाढविणारे ठरत...