टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
श्रीरामपूर – नेवासा राज्यमार्ग (Shrirampur Newasa Highway) 44 वर टाकळीभान हद्दीत अपघाताचे (Accident) सत्र सुरुच आहे. मंगळवारी झालेल्या भिषण अपघातानंतर लोखंडी फॉल जवळ टाकळीभान (Takalibhan) हद्दीत एक जनावराचे खाद्य घेवून जाणारा टेम्पो रोडवरच पल्टी झाला तर दुसर्या घटनेत टाकळीभान बसस्थानक परीसरात एका वृध्देला धक्का मारुन पोबारा केलेली चारचाकी कार मिरीकर यांच्या शेताजवळ रोडवरुन खड्यात जावून पल्टी झाली आहे.
श्रीरामपूर- नेवासा या राज्यमार्ग (Shrirampur Newasa Highway) क्र. 44 चे नुतनीकरण झाल्याने वहाने वेगाने जात आहेत. मंगळवारी लग्न समारंभ आटोपुन टाकळीभान येथे घराकडे परतत असताना बोलेरो जीपचा भिषण आपघात झाल्याने तीन जण ठार झाले होते. तर दोघांची प्रकृती गंभीर होती. या दुर्दैवी घटनेनंतर काल बुधवारी पुन्हा या राज्यमार्गावर दोन ठिकाणी अपघात (Accident) झाले. सुदैवाने या दोन्ही अपघातात जिवीत हानी झाली नसली तरी वहानांचे मोठे नुकसान झाले आहे. नेवाशाकडून जनावरांचे खाद्य घेवून श्रीरामपूरकडे येत असलेला महेंद्रा पिकआप बोलेरो टेम्पो (एमएच 16 एवाय 3905) हा भरघाव वेगाने जात असताना लोखंडी फाल परिसरातील टाकळीभान शिवारात रोडवरच पल्टी झाला.
तर दुसर्या एका घटनेत टाकळीभान (Takalibhan) येथे बसस्थानक परिसरातून ईंडीगो सीएस (एमएच 20 बीएन. 5029) जात असताना एका वृध्द महिलेला धक्का मारुन भरघाव वेगाने पळुन जात असताना एक कि.मी. आंतरावर जावून मिरीकर यांच्या शेताजवळ रोडवरुन सुमारे पंचवीस फुट खोल काट्याच्या झुडपात जावुन पल्टी झाली. सुदैवाने वृध्देला किरकोळ इजा झाली. तर चालकही या घटनेत बालबाल बचावला. मात्र, चारचाकी पल्टी होताच चालक वहान जागेवर सोडून पळून गेला.