Saturday, November 9, 2024
Homeक्राईमश्रीरामपूरच्या तीन लाचखोर पोलिसांविरुद्ध गुन्हा

श्रीरामपूरच्या तीन लाचखोर पोलिसांविरुद्ध गुन्हा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मटक्याच्या व्यवसायावर कारवाई न करता व्यवसाय चालू ठेवण्यासाठी सहा हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पाच हजार रुपये लाच घेण्याचे ठरले. तसेच 2600 रुपये किमतीची हंड्रेड पाईपर कंपनीची दारूची बाटली घेताना शहर पोलीस स्टेशनच्या तीन पोलिसांना नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. तक्रारदाराचा शहरात सुरु असलेल्या मटका व्यवसायावर कारवाई न करता व्यवसाय चालू ठेवण्यासाठी पोलीस नाईक रघुवीर कारखिले यांनी तक्रारदाराकडे सहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस उपाधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू अल्हाट, पोलीस अंमलदार किशोर लाड, सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड, उमेश मोरे, दशरथ लाड यांच्या पथकाने लाच मागणी पडताळणी केली.

- Advertisement -

दरम्यान, पोलीस नाईक रघुवीर कारखिले यांनी तक्रारदाराकडे मटक्याच्या व्यवसायावर कारवाई न करता व्यवसाय चालू ठेवण्यासाठी सहा हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर श्री.कारखिले यांनी तक्रारदार नको म्हणत असताना त्यांना त्यांच्या मटक्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणावरून तक्रारदार यांच्याकडून चार हजार रुपये त्यामध्ये पाचशे रुपये दराच्या आठ भारतीय चलनी नोटा अशी रक्कम स्वीकारली व उर्वरित एक हजार रुपये व दारूच्या खंब्याची मागणी केली.

पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे यांनी तक्रारदार यांच्या मटक्याच्या व्यवसायावर कारवाई न करता त्यांचा मटक्याचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी 2600 रुपये किंमतीची हंड्रेड पाईपर कंपनीची दारूच्या बाटलीची मागणी करून ती स्विकारण्याची तयारी दर्शवली. पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे यांनी मागणी केलेली दारूची बाटली आणण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड यांनी तक्रारदार यांना प्रोत्साहन दिल्याचे सिध्द झाले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या