Thursday, May 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजShare Market: पाच राज्यातील निवडणुकांचा शेअर बाजारावर परिणाम; सेंसेक्स निफ्टीची घोडदौड, 'हे'...

Share Market: पाच राज्यातील निवडणुकांचा शेअर बाजारावर परिणाम; सेंसेक्स निफ्टीची घोडदौड, ‘हे’ शेअर्स तेजीत

मुंबई | Mumbai
देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे प्राथमिक कल हाती येत असतानाच भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारांचा उत्साह पहायला मिळत आहे. सोमवारी सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत असून प्राथमिक कलांना बाजाराने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे बाजाराच्या हालचालीवरुन दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी चढउतार दिसून येत होते. युध्दाच्या परीणामांमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. परंतू आज शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात तेजीसह झाली. सोमवारी बीएसई सेन्सेक्स ३४.७७ अंकांच्या तेजीसह ७७,२५७.२७ अंकांवर खुला झाला. तर एनएसई निफ्टी ६६ अंकांच्या तेजीसह २४,०६३ वर व्यवहार करत होता. देशात पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांच्या सुरुवातीचे कल आणि जागतिक बाजारातील संकेतांचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.

- Advertisement -

पाच राज्यातील निकालांमुळे सत्ताधारी पक्षाच्या सकारात्मक परिणामांचे कल हाती येण्यास सुरवात होताच याचा परिणाम बाजारावर दिसण्यास सुरवात झाली. यासोबतच कच्च्या तेलाच्या किंमतीतील नरमाईमुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या तिहेरी योगायोगामुळे सोमवारी सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी दमदार वाढ नोंदवण्यात आली असून गुंतवणुकदारांमधील उत्साह दिसून येत आहे.

Baramati ByPoll Election 2026: बारामतीत बिचुकले, करुणा शर्मांच्या एकुण मतांपेक्षा ‘नोटा’ ला मतदारांची पसंती, कोणाला किती मतं?

‘या’ शेअर्समध्ये तेजी
शेअर बाजाराच्या कामकाजादरम्यान सकाळपासूनच अदानी पोर्ट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडिगो, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, एल अँड टी, सन फार्मा, एचडीएफसी, टाटा स्टील, टेक महिंद्रा, एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर रिलायन्स इंडस्ट्रिज, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स. एनटीपीसी, टायटन, एसबीआय या कंपन्याच्या शेअर्सनंदेखील तेजीसह कामकाजाला सुरुवात केली.

एकूण 903 शेअर्सचा व्यापार सुरू झाला, त्यापैकी 742 शेअर्समध्ये वाढ झाली आणि केवळ 107 शेअर्समध्ये घट झाली. तर 54 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. शिवाय, 69 शेअर्सनी त्यांच्या 52 -आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर केवळ 7 शेअर्सनी नीचांक गाठला. इतकेच नव्हे, तर 36 शेअर्स अप्पर सर्किटमध्ये आणि 13 शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले होते, ज्यामुळे बाजारातील मजबूत तेजीचा कल दिसून आला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...