Thursday, April 30, 2026
Homeक्राईमShrirampur : कोबींग ऑपरेशनमध्ये 7 आरोपींना अटक

Shrirampur : कोबींग ऑपरेशनमध्ये 7 आरोपींना अटक

2 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील शहर पोलिसांकडून शहरात बुधवारी दुपारपर्यंत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने कोबींग ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाई दरम्यान, शहर तपास पथकाने वॉरंटमधील 7 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. दहा जणांना जुगार खेळताना मुद्देमालासह पकडले. तसेच तीन जणांना धारदार तलवार, ऍडजेस्टेबल पक्कड, आणि चोरी गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी कारवाई केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे -शाहरुख ऊर्फ चपट्या शेख, अर्जुन फुलारे, रमिझ मेमन, गुफरान ऊर्फ गुफा पठाण, प्रकाश दोंड, ऋषिकेश पाटेकर, निलेश पठारे, बबन गांगुर्डे, शंकर धनवटे, दिनेश धनवटे, दत्तात्रय भंडारी, विकास धनवटे, सुरेश खरबस, शाम म्हस्के, सागर कांबळे, फिरोज पठाण, वसीम शेख, राजेंद्र सुतार, निलेश पठारे. पोलिसांनी आरोपींकडून जुगार साहित्य, धारदार शस्त्रांसह चोरी गेलेली दुचाकी जप्त केली आहे. यातील सात आरोपींवर विविध गुन्हे दाखल असून, सुमारे 2 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोलीस हवालदार दादासाहेब लोढे आणि पोलीस शिपाई अमोल पडोळे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, सचिन काकडे, सागर बनसोडे, सचिन दुकळे, आजिनाथ आंधळे, अमोल गायकवाड, रामेश्वर तारडे, संतोष कराळे, महिला पोलीस शिपाई मिरा सरग यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोयाबीनला गुरूवारी 5 हजार 915 रुपये क्विंटल भाव मिळाला. गुरुवारी सोयाबीन (Soybeans) 2 क्विंटलची आवक...