Wednesday, July 29, 2026
HomeनगरAhilyanagar : श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, संगमनेरातही पाऊस

Ahilyanagar : श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, संगमनेरातही पाऊस

अहिल्यानगर | Ahilyanagar

काल रविवार दि.28 जुलै रोजी रात्री अहिल्यानगर, पाथर्डी, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, संगमनेरात आद्रा नक्षत्राचा पहिलाच पाऊस कुठे जोरदार तर कुठे रिपरिप झाली. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या असून पेरणीच्या कामाला वेग येणार आहे. सायंकाळी 6 वाजेपासून सुरू झालेला पाऊस रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होता. श्रीरामपूर शहर व परिसर, बेलापूर, टाकळीभान, अशोकनगर, तसेच गोदाकाठच्या खानापूर, भामाठाण, कमालपूर, घुमनदेव, माळवाडगाव मुठेवाडगाव परिसरात आद्रा नक्षत्राचा पहिलाच समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण दिसून आले.
कोपरगाव आणि राहाता तालुक्यात काही ठिकाणी रिमझीम तर काही ठिकाणी रिपरिप सुरू होती.

- Advertisement -

राहुरी प्रतिनिधीने कळविले की, राहुरी तालुक्यात रविवारी सायंकाळी मेघगर्जनेसह दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावली. सुमारे दीड ते दोन तास सुरू असलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामातील कपाशी, मका तसेच अन्य पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरला आहे. राहुरी शहरासह टाकळीमिया, देवळाली प्रवरा, उंबरे, ब्राम्हणी, वळण आणि परिसरातील अनेक गावांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, दमदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला.

या पावसामुळे जमिनीत चांगला ओलावा निर्माण झाला असून नव्याने पेरणी केलेल्या तसेच उगवण झालेल्या कपाशी, मका आणि इतर खरीप पिकांच्या वाढीस चालना मिळणार आहे. तसेच रखडलेली खरीपाची पेरणी जोमाने सुरू होणार असून आगामी काही दिवसांतही अशाच स्वरूपाचा पाऊस कायम राहिल्यास खरीप हंगामासाठी तो अधिक लाभदायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. तरीही पावसाच्या दमदार हजेरीमुळे तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले. संगमनेर प्रतिनिधीने कळविले की, शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात रविवारी सायंकाळनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

विशेषतः साकूर आणि घारगाव परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. शहरातही सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असले तरी पावसामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. हवामान अनुकूल राहिल्यास आगामी काही दिवसांत खरीप पिकांच्या पेरण्या अधिक वेगाने पूर्ण होतील, असा विश्वास शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे. पावसाच्या या आगमनामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

जिल्ह्यात 1 जुलैपासून जोरदार पाऊस
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 1 जुलैपासून पाऊस धुमाकूळ घालणार असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात राज्यात पाऊस होणार आहे. मुंबई, पुणे, अकोले, अहिल्यानगर, संगमनेर, ओझर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागातील शेतकर्‍यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात काळजी घ्यावी. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस असेल. अतिवृष्टी होऊ शकते. पुण्यातही अतिवृष्टी होऊ शकते. शिर्डी, राहाता, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, फुलंब्री या पट्ट्यातही जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. जमिनीत ओल असेल तर पेरणी करून घ्यावी अन्यथा 10 जुलैपर्यंत थांबावे लागेल, असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : राहुल गांधींना देशाशी काहीच देणंघेणं नाही, त्यांचा अजेंडा…;...

0
मुंबई | Mumbai लोकसभेत 'अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयका'वर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (बुधवारी) भाषण केले. यावेळी त्यांनी...