Friday, July 31, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपुरात मध्यरात्री नऊ वाहनांची तोडफोड

Shrirampur : श्रीरामपुरात मध्यरात्री नऊ वाहनांची तोडफोड

अनोळखी इसमांची हातात तलवार || लोखंडी कोयते घेऊन दहशत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील जुनी घासगल्ली, भगतसिंग चौक येथे काल शनिवारी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास रस्त्यावर लावलेल्या नऊ वाहनांची अज्ञात 6 ते 7 इसमांनी तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन-तीन दिवासांपूर्वी नगरपालिकेसमोर झोलेल्या घटनेचा या घटनेशी सबंध असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलीस हवालदार मच्छिंद्र शेलार, पोलीस नाईक किरण टेकाळे व माझी रात्रपाळी पेट्रोलिंग करीता नेमणूक करण्यात आली होती. डायल 112 करीता पोलीस हवालदार शेलार व पोलीस नाईक श्री. टेकाळे यांची तर रात्रपाळी अधिकारी म्हणून पोलीस नाईक गणेश जाधव यांची नेमणूक करण्यात आली होती. आम्ही रात्रपाळी पेट्रोलिंग करीत असताना काल पहाटे 4.29 वाजता डायल 112 वर कॉल आला, जुनी घासगल्ली, भगतसिंग चौक येथील गल्लीमध्ये रोडवर लावलेल्या 10 ते 15 वाहनाच्या 4 ते 5 इसमांनी काचा फोडून नुकसान केले आहे. असा कॉल आल्याने आम्ही तात्काळ सदर ठिकाणी गेलो. तेव्हा सदर ठिकाणी साक्षीदार नामे रामदास जाधव, संकेत पाटील, समीर नजीर पठाण, तौसिफ रशीदखान पठाण, सलमान इब्राहीम शेख, राजू सय्यद हे उभे होते.

यातील साक्षीदार मनोज रामदास जाधव यांनी सांगितले की, पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास आमच्या गल्लीमध्ये जोरजोरात शिवीगाळ करण्याचा आवाज आला म्हणून मला जाग आली. तेव्हा मी खिडकीतून बाहेर पाहिले असता मला 6 ते 7 अनोळखी इसम हे हातात तलवार, लोखंडी कोयते घेऊन, शिवीगाळ करत बाहेर या एकऐकाला कापून टाकतो. येथे आमचेच राज चालेल असे जोरजोरात बोलत होते. त्यानंतर सदर इसमांनी त्यांच्या हातातील तलवार व कोयत्यांनी बाहेर उभ्या असलेल्या आमच्या वापरत्या तसेच व्यवसायाच्या वाहनांच्या काचा फोडायला सुरूवात केली.

त्यांच्या हातात हत्यार असल्याने मी, घराच्या बाहेर आलो नाही. व ते गेल्यावर आम्ही गल्लीतील सर्वजण बाहेर आलो.तेव्हा आमच्या वाहनाच्या काचा फोडून नुकसान केल्याचे दिसून आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान सीसीटीव्ही फुटेज वरुन पोलिसांनी तपास सुरु केला असून दोन-तीन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तोडफोड केलेली वाहने
मनोज जाधव यांचे छोटा हत्ती (क्र. एमएच 14 डीएम 8661) व सफेद रंगाचा छोटा हत्ती (क्र.एमएच 14 डीएम 9641), संकेत संदीप पाटील यांची सुझुकी कंपनीची काळया रंगाची कार (एमएच 04 ईएक्स 0181) व टाटा कंपनीची 207 पिकअप (क्र. एमएच 10 झेड 8334), समीर नजीर पठाण यांची अ‍ॅपे रिक्षा (क्र. एमएच 17 एजे 6694), तौसिफ रशीदखान पठाण यांची टाटा एस (क्र. एमएच 20 ईजी0207), सलमान इब्राहीम शेख यांची अ‍ॅपे रिक्षा (क्रज. एमएच 17 व्ही 4803), राजू जाकीर सय्यद यांची अ‍ॅपे रिक्षा (क्र.एमएच 20 टी 2349) व गणेश रामदास जाधव यांची पाणीपुरी स्टॉलची हातगाडी.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा पाणलोटात पुन्हा पाऊस; निळवंडेतून 10209 क्युसेकने विसर्ग

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. भंडारदराचा विसर्ग, वाकी तलावाचा ओव्हरफ्लो त्यामुळे निळवंडेतही आवक वाढल्याने...