Thursday, March 13, 2025
Homeनाशिकदेवळ्यातील कणकापूर येथील घुबडदरा शिवारात बिबट्याचे दर्शन

देवळ्यातील कणकापूर येथील घुबडदरा शिवारात बिबट्याचे दर्शन

देवळा | प्रतिनिधी | Deola

तालुक्यातील कणकापूर (Kankapur) येथील घुबडदरा शिवारात बुधवार (दि.८) रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास बिबट्या (Leopard) आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे परिसरात शेतात (Farm) वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा तालुक्यातील (Deola Taluka) पश्चिम भागातील अतिदुर्गम अशा कणकापूर येथील ऐतिहासिक अशा कांचन मांचन किल्ल्यालगत असलेल्या घुबडदरा शिवारात बुधवारी (दि.०८) रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास शेतकरी सागर शिंदे हे आपल्या शेतात कांद्याना बारे (पाणी) देत असतांना त्यांना बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला. शिंदे यांनी आपल्या हातातील बॅटरी लावून बघितल्यावर तो शेजारीच असलेल्या शेततळ्याजवळ उभा असतांना दिसला .

त्यानंतर शिंदे यांनी शेततळ्याला लावलेल्या संरक्षण जाळीत प्रवेश करून लगत असलेल्या या बिबट्याचा आपल्या मोबाइल मध्ये फोटो काढला. यानंतर बिबट्याने या ठिकाणाहून काढता पाय घेतला.या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड सुरू असून कांदे लावण्यासाठी मजूर भेटत नसल्याने शेतकरी मोटाकुटीस आला आहे.याठिकाणी रात्री देखील मजूर कांदे (Onion) लावत आहेत.

दरम्यान, दिवसा वीज पुरवठा नसल्याने शेतकरी (Farmer) रात्री कांद्याना पाणी भरत असून यात बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने याची तात्काळ दखल घेऊन या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा ,अशी मागणी येथील शेतकरी सागर शिंदे, जगदीश शिंदे, तुषार शिंदे यांनी केली असून या घटनेबाबत येथील नागरिकांनी वन विभागाला माहिती दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...