Monday, April 6, 2026
Homeभविष्यवेधकाळ्या मुंग्या असण्याचे संकेत

काळ्या मुंग्या असण्याचे संकेत

ज्योतिषशास्त्राप्रमाणे घरात मुंग्या असतील जीवनात काही वेगळे घडणार असल्याचे संकेत आहे असे समजावे. घरात अचानक काळ्या मुंग्या दिसू लागल्या तर त्या ऐश्वर्य आणि धनवृद्धीचे संकेत देतात. परंतु मुंग्या अधिक प्रमाणात असल्या तर कुटुंबात मतभेद होऊ शकतात म्हणून मुंग्यांना साखर टाकावी.

याचा एक अर्थ तर हा आहे की, कमी संख्येत मुंग्या असणे सुख, शांती आणि समृद्धीसाठी सकारात्मक संकेत आहे. परंतु अधिक संख्येत मुंग्या असल्यास घराबाहेर गूळ ठेवावा. त्यामुळे घरातील मुंग्या नाहीशा होतील. तसेच एक उपाय हा देखील आहे की काळ्या मुंग्या लक्ष्मीचे रुप मानले गेले आहे. काळ्या मुंग्यांची झुंड दिसल्यास त्यांना हळद- कुंकू वाहण्याची प्रथा आहे. यानंतर शक्य असल्यास लाल रंगाचे वस्त्र नेसून लक्ष्मीची उपासना करणे लाभदायक ठरेल.

- Advertisement -

तसेच नवीन घराचा पाया ठेवताना तेथे काळ्या मुंग्या दिसणे शुभ आहे. मुंग्यांचा झुंड असल्यास आधी त्यांना कणिक टाकावी नंतर काम सुरू करावे. मोठ्या प्रमाणात मुंग्या दिसणे संकट येण्याची शक्यता दर्शवतं म्हणजे अचानक घरात दाणे एकत्र करत असलेल्या मुंग्या दिसू लागल्या तर संकट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या व्यतिरिक्त रांगेत जाणार्‍या अधिक संख्येत मुंग्या चालत असल्या तर पावसाचे संकेत आहे. या व्यतिरिक्त नमकीन पदार्थांमध्ये मुंग्या लागल्यास वाईट काळ येण्याचे संकेत असतो.

ताज्या बातम्या

Kopargaon : सोनेवाडीच्या तरुणाचा कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मृत्यू

0
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi कष्टाने मिळवलेले यश आणि कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला (Mahabaleshwar) गेलेल्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. कोपरगाव...