Sunday, November 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसिंहस्थ महाकुंभमेळा : तरुणाईलाही सिंहस्थाची भुरळ; ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी जेन झी गर्दी

सिंहस्थ महाकुंभमेळा : तरुणाईलाही सिंहस्थाची भुरळ; ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी जेन झी गर्दी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

सिंहस्थ मेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याने केवळ ज्येष्ठ आणि धार्मिक भाविकांनाच नव्हे, तर तरुणाईलाही भुरळ घातली. आधुनिक जीवनशैलीत रमणाऱ्या तरुण-तरुणींनीही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी रामकुंड परिसरात मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विशेषतः युवतींमध्ये या सोहळ्याबाबत कमालीची उत्सुकता दिसून आली. आयुष्यात एकदाच मिळणारा हा अनुभव असल्याची भावना व्यक्त करत अनेक तरुणींनी सिंहस्थाचा आनंद मनमुराद लुटला.

वडिलांचा आग्रह, मैत्रिणींची साथ
सिंहस्थाचा हा नवीन अनुभव घेताना खूप आनंद होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची मनापासून इच्छा होती. मात्र, आई मला येथे पाठवण्यास तयार नव्हती. अखेर वडिलांच्या आग्रहामुळे आणि मैत्रिणींच्या साथीने हा अनुभव घेण्यासाठी नंदुरबारहून येथे आले. हा क्षण प्रत्यक्ष अनुभवता येत असल्याचा विशेष आनंद आहे, अशी भावना समृद्धी प्रजापती हिने व्यक्त केली.

आयुष्यातील अविस्मरणीय क्षण
या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होताना खूप छान वाटत आहे. हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याचा आनंद काही वेगळाच आहे. माझ्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा आणि कायम स्मरणात राहणारा क्षण ठरला आहे, अशी प्रतिक्रिया लुब्धा भदाणे हिने दिली.

तरुणाईनेही हा अनुभव घ्यायलाच हवा
माझ्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. नाशिकमधील महाकुंभाचा सोहळा आज प्रत्यक्ष डोळ्यांत साठवून ठेवताना अतिशय आनंद होत आहे. आयुष्यातील हा क्षण जपून ठेवण्यासारखा आहे. पवित्र स्थळी उपस्थित राहून सिंहस्थाचा अनुभव घेणे हा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. जीवनात अनेक गोष्टी अनुभवता येतात; मात्र हा अनुभव निश्चितच वेगळा आहे. जनरेशन झी आणि मिलेनियल्समधील तरुणाईनेही हा अनुभव आवर्जून घ्यायला हवा, असे मत वेदिका जाधव हिने व्यक्त केले.

ताज्या बातम्या

मनमाडमध्ये पावसाची हजेरी; आठवडे बाजारात ग्राहकांसह व्यावसायिकांची तारांबळ

0
मनमाड | प्रतिनिधी Manmad शहरासह परिसरात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानकपणे आलेल्या या पावसाने आठवडे बाजारातील ग्राहकांसह व्यावसायिकांची त्रेधातिरपीट उडवून दिली. गेल्या तीन दिवसापासून परिसरात...